सुधीरभाऊ म्हणजे विकासपुरुष कार्यक्रमात मान्यवरांचे ठाम प्रतिपादन

0
36

 

ना.मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त शुरवी महिला महाविद्यालय मुल येथे आरोग्य तपासणी,वृक्षारोपण व गणवेश वाटप

मूल,

दि.३१ : चंद्रपूर जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे, लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री मा.नामदार श्री. सुधीर मुनगंटीवार हे खऱ्या अर्थाने विकासपुरुष व लोकनेते आहेत, या शब्दांत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मान्यवरांनी गौरव केला.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण व गणवेश वाटपाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्यासह सर्व मान्यवरांनी ना. मुनगंटीवार यांच्या कार्याचे व व्यक्तिमत्वाचे कौतुक केले. मूल येथील शुरवी महिला महाविद्यालय येथे श्री माता कन्यका सेवा संस्थेच्या वतीने ब्रेस्ट व युटेरस कर्करोग तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद‌्घाटन संध्याताई गुरनुले यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महामंत्री महिला मोर्चा अल्का आत्राम, माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर,वंदना आगरकाटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेश इंगोले होते. संस्थेचे अध्यक्ष सुरेश कापर्ती, सचिव राजेश्वर सुरावार, अनिल दंडमवार, दिलीप नेरलवार, शैलेंद्रसिंह बैस, अजय गोगुलवार, जीवल कोतमवार यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरात एकूण ३५० महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामधील संशयित रुग्णांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूर येथे पुढील तपासणी व उपचार करण्यात येणार आहे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिनाक्षी राईंचवार यांनी केले. प्रा. हर्षा खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here