*तलाठी यांची जबाबदारी शंस्यास्पद !*
दि. 02 ऑगस्ट 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा यांना गुप्त माहिती मिळाली की चंदनखेडा येथे बेकायदेशीर रित्या रेतिची तस्करी करुन त्याचा साठा गोळा करण्याच काम सुरु आहे. तेव्हाच घटना स्थळी जाउन बघताच तिथे दिसले की विट्ठल मंदिराच्या मागे खुप मोठ्या प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध आहे. लगेच तत्काळ चंदनखेडा ग्रामपंचायतचे सरपंच नयन जांभळे यांना सुरज भाऊ शहा यांनी फोन केला असता त्यांनी सांगितले की हा रेतीचा साठा तहसीलदार यांनी जप्त केलेला आहे.
यावर ग्रामपंचायतचे तलाठी यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की या रेती साठ्या बद्दल मला काहीही माहिती नाही व आतापर्यंत तहसीलदार मार्फत अशी कोणतीही कारवाई झालेली नाही ज्यामध्ये रेतीसाठा विठ्ठल मंदिराच्या मागे जमा करण्यात आला असेल.
त्यानंतर तिथल्या एका ग्रामपंचायत सदस्य यांना फोन करण्यात आले तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हा रेतीसाठा सरपंच नयन जांभूळे यांचा आहे व हे रेती साठा बेकायदेशीर रित्या तिथे जमा करून ठेवण्यात आला आहे. आदर्श ग्रामपंचायत असलेल्या चंदनखेडा येथे लोकनियुक्त सरपंच बेकायदेशीर काम करत असेल तर इथले नागरिक आपली समस्या घेऊन कायदेशीर कुठे जाणार ? असा प्रश्न इथल्या नागरिकांना आला आहे. काही दिवसा अगोदर इथले ग्रामसेवक सुद्धा कार्यालयातच मद्यपान करताना आम आदमी पार्टी ने समोर आणले होते. जर या गावातलेच सरपंच व ग्रामसेवक असे बेकायदेशीर काम करत असेल तर यांना यांच्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, यांनी तत्काळ राजीनामा द्यावा किंवा शासनाने तत्काल यांना पदावरून निलंबित करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर अध्यक्ष सुरज शाहा यांनी केली आहे.
*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793