*श्री.अनिल डोंगरे यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड.*

0
23

======================

महाराष्ट्राचे विकास पुरुष लोकनेते मा.ना.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य मत्स्यव्यवसाय यांचे शिष्य श्री.अनिल डोंगरे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेत पुनश्च एकदा भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारणीत पदोन्नती करून त्यांचे प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. *मा.ना.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे विचार अंगीकारून ते राजकारणात,समाजकारणात कार्य करू लागले त्यांच्या उल्लेखनीय कार्याची समाज व समाजातील काम करणारे नेते मंडळी त्यांचे कार्य टिपत गेले.नुकत्याच झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणीत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.राहुलजी लोणीकर यांनी आपल्या पत्रानुसार त्यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.* श्री.अनिल डोंगरे हे वयाच्या वीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एका छोट्या गावापासून ते तालुका ते प्रदेश याप्रमाणे उल्लेखनीय कार्य करून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. मागील भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणीत प्रदेश सचिव तसेच गडचिरोली जिल्हा प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. *त्यांनी पक्षाच्या प्रत्येक जबाबदारी चांगले काम करून पक्ष संघटनेत आपल्या नावाचा ठसा उमटविला.* तसेच राजकीय पक्षाच्या व्यतिरेक ते परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेत पंधरा वर्षापासून कार्यरत आहे. *त्यांनी त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन हजारच्या संख्येने दारू व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना व्यसनमुक्त केले.या संघटनेची मागील पाच वर्षापासून जिल्हाध्यक्षाची धुरा त्यांच्याकडे आहे.* त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी *महाराष्ट्र शासनाने* *2017/18 च्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने पुरस्कार देऊन सन्मानित केले.* मागील *पंधरा वर्षापासून विचोडा – चांदसुरला या तीन गावची* *ग्रामपंचायतची धुरा सरपंच,उपसरपंच म्हणून जवाबदारी त्यांच्या परिवारातील व्यक्ती व स्वतः त्यांच्याकडे आहे* . या सर्व उतुंग कामाचे त्यांचे गुरु मा. ना.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच प्रदेश संघटनेने विचार करून पक्षाचे नियम अटी यांना बगल देत त्यांची पुन्हा एकदा भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीबद्दल जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून श्री.अनिल डोंगरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री मा. नाम.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार.भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे मा.श्री. हंसराज अहिर ओबीसी मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग अध्यक्ष मा.श्री.विक्रांतजी पाटील प्रदेश महामंत्री भाजपा मा.श्री.राहुलजी लोणीकर प्रदेशाध्यक्ष भाज् युमो महाराष्ट्र मा.श्री. हरीशजी शर्मा जिल्हा अध्यक्ष भाजपा यांचे निवडीबद्दल आभार धन्यवाद मानले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here