=================
🇮🇳 Hello Chanda news
================
चंद्रपूर येथील 100 तर घुग्घुस येथील 75 फुट उंचीच्या तिरंगा झेंड्याचे आ. जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण
=========================
अन्न, वस्त्र आणि निवारा यासह स्वांतत्र ही सुध्द मानवाची मूलभूत गरज आहे. शुरवीर क्रांतीकारकांच्या त्यागातून आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र अबादीत ठेवत देशाला बलशाली बनविण्याचे काम स्वातंत्र देशातील नागरिक म्हणून आपल्या कडून झाले पाहिजे. हर घर तिरंगा उपक्रम देशात राबविल्या जात आहे. हा उपक्रम चंद्रपुरात उत्सव म्हणून प्रत्येक घरी साजरा झाला पाहिजे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
स्थानिक आमदार निधीतून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील पोलिस मुख्यालय येथे 100 फुट उंचीचा तर घूग्घूस येथील बस स्थानक येथे 75 फुट उंचिचा तिरंगा झेंडा उभारला आहे. आज याचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, एडीशनल पोलिस अधिक्षक विना जनबंधू, तहसिलदार विजय पवार, मनपा उपायुक्त अशोक गराटे, वन विभागाचे जितेंद्र रामगावकर, मंगेश खवले, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, एस. टी महामंडळच्या जिल्हा नियंत्रक स्मिता सुतावणे, घुग्घूसचे पोलिस निरीक्षक आसिफ शेख, मधूकर मालेकर, काॅंग्रेस घुग्घूस शहर अध्यक्ष राजू रेड्डू, यंग चांदा ब्रिगेडचे इमरान शेख, उषा अगदारी, स्वप्नील वाढई, मुन्ना लोढे, नविन मोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, तिरंगा हा देशाची शान आहे. ऊर्जेचा स्त्रोत आहे. संपुर्ण देश वासियांना तिरंगा प्रती आदर आहे. त्यामुळे केद्र सरकारने हर घर तिरंगा हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला चंद्रपूरातही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमा अंतर्गत महानगर पालिकेच्या वतीने तिरंगा वितरीत केल्या जाणार आहे. नागरिकांनी तो आपल्या घरी लावाला असे आवाहण यावेळी त्यांनी केले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात 75 ते 100 फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा अशी भुमिका राज्य सरकारची होती. आपणही यासाठी आपल्या विधानसभा क्षेत्रात येणा-या घुग्घुस आणि चंद्रपूर येथे सदर उंचीचा राष्ट्रध्वज कायमस्वरूपी लहरत राहावा याकरिता निधी उपलब्ध करून दिला होता. याचे काम पुर्ण झाले आहे. आज याचे लोकार्पण पार पडले. आज पासुन येथे स्वातंत्र्याचा प्रतिक असलेला तिरंगा उभा राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
जगातील सर्वात चांगली लोकशाही व्यवस्था आपल्याला मिळाली आहे. याचे जतन आणि पालन करणे आपल्या सर्वांचे कत्यव्य आहे. आज येथे 100 फुट उंचिचा तिरंगा ध्वजाचे लोकापर्ण झाले आहे. आता हे पवित्र स्थान झाले आहे. याचे पावित्र कायम राहिले पाहिजे. येथे असलेल्या भिंतीपण बोलक्या करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======≈=================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793