प्रशिक्षीत झालेल्या महिलांनी रोजगार उभारावा – आ. किशोर जोरगेवार

0
34

======================

1 महिण्याच्या प्रशिक्षणा नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचा समारोप, शेकडो महिला झाल्या प्रशिक्षीत

======================

   महिलांना स्वताचा व्यवसाय सुरु करता यावा याकरिता विविध प्रकारच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आपण यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून करत आहोत. या शिबिरात 1 महिण्याचे प्रशिक्षण पूर्ण करुन शेकडो महिला प्रशिक्षीत झाल्या आहे. घेतलेले हे प्रशिक्षण शिक्षणापूरते मर्यादीत न ठेवता यातून स्वताच्या हक्काचा व्यवसाय सुरु करत रोजगार उभारावा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने “माहेरघर” बाबुपेठ आणि दादमहल वार्ड येथे आयोजित ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचा आज सोमवारी समारोप करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी….. यंग चांदा ब्रिगेड, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदना हातगावकर, संघटिका सायली येरणे, संघटिका सविता दंडारे, कल्पना शिंदे, नंदा पंधरे, आशा देशमुख, कविता निखारे, माधुरी निवलकर, नीलिमा वनकर, रूपा परसराम, ब्युटी पार्लर प्रशिक्षिका कीर्ती गुरुनुले आदींची उपस्थिती होती.

 =======================

यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले किशहरातील विविध भागात आपण विशेषता महिलासांठी विविध प्रकारच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करत आहोत. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित या शिबिरांमध्ये आता प्रयत्न आपण जवळपास तिन हजार महिलांना विविध प्रकारचे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले आहे. यातील अनेक महिलांनी स्वत:चा रोजगार सुरु केला आहे. यात सुरवातीला कमी मिळकत मिळत असली तरी स्वमालक मालक म्हणून काम करण्याचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे नौकरीच्या शोधात राहण्यापेक्षा प्रशिक्षीत होन स्वयंरोजगाराकडे कल वाढविण्याचे ते यावेळी म्हणाले. मतदार संघात विविध विकासकामे केल्या जात आहे. अभ्यासिका आणि समाज भवनाचे निर्माण करण्यावर आमचा अधिक भर आहे. तयार होत असलेले हे समाज भवनात स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिल्या जाईल तर अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रसन्न वातावरणात अभ्यास करण्याकरिता स्वताच्या हक्काचे व्यासपीठ मिळेल असेही ते यावेळी म्हणाले. तर दुसरीकडे आपण महिला आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या विकासासाठी शक्य ते प्रयत्न करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित सदर ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिरात हेअर स्टाईलव्हॅक्समेनिक्युअरपेडिक्युअरहेड मसाजशॅम्पूमेहंदीडायफेशिअप्लकींगसाडीचे प्रकारमेकअपहेअर कटींगपार्टी वेअर मेकअप आदी प्रकारचे प्रशिक्षण महिलांना दिल्या गेले. यावेळी आमदार जोरगेवार यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी महिला आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here