===========≈===========
चंद्रपूर (१५ ऑगस्ट )
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टी चंद्रपूरच्या वतीने शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. आम आदमी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत शहरात राजकीय ताकदीचे प्रदर्शन दिसून आले. शहरातील पक्ष बांधणीच्या विस्तारासाठी तिरंगा यात्रा अत्यंत महत्त्वाची होती.
========================
भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा 76 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. यानिमित्त आम आदमी पार्टीने (AAP) ने चंद्रपूरमध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकात सकाळी 8:30 वाजता देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर तिरंगा रॅली निघाली. अभिमानाने तिरंगा फडकवताना, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी असंख्य व्यक्तींनी केलेल्या बलिदानाची नागरिकांना आठवण करून देणारी ही यात्रा एकतेचे प्रतीक बनली. देशभक्तीची भावना घेऊन विविधता आणि एकात्मतेचे दर्शन घडविणारी ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गाने निघाली. “बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो, हा जयघोष याप्रसंगी दुमदुमला.
यावेळी आम् आदमी पार्टीचे
सुनील देवराव मुसळे वरिष्ठ नेते,
मयूर राईकवार जिल्हा संयोजक,
योगेश गोखरे महानगर संयोजक,
योगेश मुऱ्हेकर विधानसभा अध्यक्ष, adv सुनीता पाटील महानगर संयोजिका, Adv तबसुम्म , रवी पप्पुलवार, ज्योती बाबरे, प्राध्यापक नागेश्वर गंडलेवार अमित बोरकर,दिपक बेरसेट्टीवर,मधुकर साखरकर,राजू कुडे,सुजित चेटगुलवार,नासिर भाई शेख,नागसेन लाभाने,जितेंद्रकुमार भाटिया,संतोष दोरखंडे,बादल खोटे,सैयद अशरफ,विजेंद्र सिंह गिल,लक्ष्मण पाटील,नमिता पाटील.प्रशांत रामटेके,दिलीप चाहांदे,रोशन मुढळकर,मृणाल.पाटील,
प्रणाली पाटील,शेख अशरफ कुरेशी,आरिफा कुरेशी,माया दूपारे.
शबनम मॅडम,मंगला मुके
लिलाबाई नवघरे ,जास्मिन शेख ,पिके बुद्ध वाल, मीना पोटफोडे, बेबीताई, प्रशांत रामटेके, स्वाती डोंगरे,
भीमराव मेंढे ,विकास खाडे , संतोष सलामे , अनुप नाईक , डॉक्टर देवेंद्र अहिर, , गिरीश सोमलकर, शुभम देवगडे, युगल अलोने , अजिंक्य अंगुलवार, जयप्रकाश, कार्तिक बुरकुटे, आदित्य, अनिकेत लडके ,संदीप ठमेकर, शुभम, कुणाल बोरकुटे , नागसेन लभाने तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यात पक्षाचे पदाधिकारी, सदस्य आणि समर्थकांचा उत्साही सहभाग होता. मिरवणुकीने शहरातून मार्गक्रमण केल्याने नागरिकाचे लक्ष वेधून घेत, चंद्रपूरचे रस्ते चैतन्यमय तिरंगा यात्रेत न्हाहून निघाले होते.
===========================
आम आदमी पार्टीने चंद्रपूरमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळात पोहोचण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित आज दिसून आले.
पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकारी यांनी तिरंगा यात्रेत संबोधित करताना लोकशाही मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी, चांगले प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी आणि सामान्य माणसाचे हित जपण्यासाठी पक्षाला सत्तेत संधी देण्याचे आवाहन केले. .
=======================
तिरंगा यात्रेचा समारोप होताच, चंद्रपूरवर आम आदमी पार्टीने आपली अमिट छाप सोडली असून, समाजाच्या भल्यासाठी राजकीय शक्ती प्रदर्शन आम आदमी पक्षाने यानिमित्ताने केले.
==================
75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टी चंद्रपूरने काढलेली तिरंगा यात्रा देशप्रेम , समता, एकता, बंधुता अशा प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भविष्याच्या वाटचालीत आशा आणि परिवर्तनाचा दिवा म्हणून उभी आहे.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793