=========≈==========≈==≈=
जिवती:- तालुक्यातील शेतकरी पीक कर्ज योजनेपासून आताही वंचित तालुक्यातील बॅंका शेतकरी विरोधी असे म्हणायला हरकत नाही शेतकऱ्यांनचे खरीप पीक पेरणीचे हंगाम संपत आले तरी पण शेतकऱ्यांना बियाणे खते औषधी घेण्यासाठी पीक कर्ज उपलब्ध झाले नसून शेतकऱ्यांनी बी बियाणे खते कीडनाशके हे सर्व सावकाराकडून व्याजाने घेऊन पेरणी केली तरीपण बॅंकानी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले नाही म्हणून हकानी शेख तालुका अध्यक्ष मनसे यांनी बॅंकेचे अधिकारी सोबत भेट घेऊन चर्चा केली असता बॅंकेचे अधिकारी चर्चेत बोलत होते की जे सातबारे तलाठी व मंडळ अधिकारी कडून तपासून आले आहे ते बोगस आहे अश्या रितीने कटकारस्थान बॅंकेचे अधिकारी शेतकऱ्यांन सोबत करत असल्याची माहिती चर्चेत समोर आली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीचे अध्यक्ष हकानी शेख यांनी कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मनसेचे जिल्हाध्यक्ष मंदीप रोड यांना निवेदन देण्यात आले या आठ दिवसांत पीक कर्ज मंजूर करून शेतकऱ्यांनच्या खात्यावर रक्कम जमा करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिवतीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष हकानी शेख यांनी निवेदनाद्वारे दिला निवेदन देताना मनसे कार्यकर्ते व वंचित शेतकरी उपस्थित होते
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793