स्वयंरोजगार निर्मितीसाठी भगिनींना प्रशिक्षीत करण्याचा आमचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार

0
32

======================

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन
=========≈=======≈===≈

राखी चा दोरा हा नुसता दोराच नसून तो बहिण- भावाच्या नात्याचे प्रतिक आहे. ते एक शील, प्रेमळ, मायाच्या पवित्र्याचे रक्षण करणारे बंधन आहे. भगिनींचे रक्षण करत असतांना त्यांना आत्मनिर्भरपणे जगता यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु असुन भगिनींना स्वयंरोजगार निर्मीतीसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा आपण संकल्प केला असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी यंग चांदा ब्रिगेड च्या महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कल्याणी किशोर जोरगेवार, गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, बंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारे, सायली येरणे, आशा देशमूख, विमल कातकर, अस्मिता डोणारकर, कौसर खान, निलिमा वनकर, कल्पना शिंदे, वैशाली मेश्राम, सोनाली आंबेकर, वंदना हजारे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेड संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात मोठे काम केल्या जात आहे. हे काम होत असतांना महिला नेहमी केंद्रस्थानी राहिल्या आहे. महिलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आपण महिलांना होणा-या आजारा संदर्भात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. तर महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आपण स्वयंरोजगारा संदर्भातले विविध प्रकारचे प्रशिक्षण महिलांना उपलब्ध करुन देत आहोत. यात ब्युर्टी पार्लर, शिवणकाम यासह अनेक प्रकारच्या प्रशिक्षणांचा समावेश आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित या प्रशिक्षण शिबिरामध्ये आता प्रयत्न आपण 2 हजाराहुन अधिक महिलांना प्रशिक्षीत केले असल्याचेही यावेळी बोलतांना ते म्हणाले.
यंग चांदा ब्रिगेड ही एक संघटना नसुन परिवार आहे. या परिवारातील प्रत्येक महिला ही आंनदी आणि निरोगी असली पाहिजे या दिशेने संघटना काम करत आहे. राखी चा दोरा हा नुसता दोराच नसून तो बहिण- भावाच्या नात्याचे प्रतिक आहे. आज आपण मझ्या मनघटाला राखीचा पवित्र धागा बांधला आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. आपल्या प्रत्येक कठीण काळात हा भाऊ आपल्या पाठीशी उभा राहणार असल्याचेही यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले
यावेळी महिला भगिनींनी आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधली. आमदार किशोर जोरगेवार यांनीही आपल्या बहिणींना ओवाळणी स्वरुप भेट वस्तू दिल्यात. आपले प्रेम असेच कायम राहिली अशी अपेक्षाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलून दाखविली. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here