मुलींच्या घोषणांनी परिसर निदादला.
चंद्रपूर येथील जनसंवाद यात्रेत मोठ्या प्रमाणात मुलींनी उस्फूर्तपणे समोर येत सहभाग दर्शविला
ले मशाली चल पडे है ,लोग मेरे गाव के ,अब अंधश्रद्धा दूर करेंगे लोग मेरे गाव के.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांच्याहून अधिक काळ संघटित रित्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहे .डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी या समितीची स्थापना केली. सुरुवातीला मुठभर कार्यकर्त्यांच्या सोबत सुरू झालेले हे काम आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे .डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्गुण खुनानंतर देखील अत्यंत निर्धाराने हे काम दशक भर चालू आहे. महाराष्ट्रातल्या प्रगतशील विचारांचा वारसा आहे. इथली संत परंपरा आणि समाज सुधारक यांनी चालू केलेले कृतिशील समाजप्रबोधनाचे काम समिती आपल्या ताकतीने पुढे नेण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती झाली दिसत असली, तरी अजूनही समाजमनावर अंधश्रद्धेचा पगडा टिकून राहिला दिसतो. केवळ तेवढेच नाही , तर विज्ञानाचे नाव वापरून त्या माध्यमातून अंधश्रद्धांचा प्रसार केला जाताना देखील दिसून येतो. या सगळ्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, हे चित्र बदलावे असे वाटत असेल, तर हे आव्हान तुमच्यासाठी आहे. हेच आव्हान घेऊन ते पेलवण्यासाठी जनसंवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर पुढे निघालेली आहे हा विचार जनसंवादामधून कॉलेज, महाविद्यालय, शाळा यांच्याशी संवाद करताना जनसंवाद टीमच्या मार्गदर्शनातून मांडला गेला. आणि या सवांदाला दाद देत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी निर्भय झाले ,बोलू लागले वैज्ञानिक दृष्टिकोन मांडू लागले तर्क वितर्क मांडू लागले हे या जनसंवाद यात्रेचे फलित आहे. २०ऑगस्ट २०२३रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खूणाला १०वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने जादूटोणाविरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा २०ऑगस्ट२०२३पासून पासून पुणे येथील म .विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून कायद्याची चित्रमय पोस्टर लावून सजवलेल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून पुढील कार्यास रवाना केले आहे. या यात्रेत संयोजन व समन्वयक मार्गदर्शक म्हणून राज्य कार्यकारी समितीचे सदस्य प्रशांत पोतदार सातारा ,यवतमाळ पर्यंत त्यानंतर सम्राट हटकर नांदेड, त्यानंतर पूर्णपणे राज्य कार्यकारी सदस्य नंदिनी जाधव पुणे, भगवान रणदिवे राज्य बुवाबाजी संघर्ष कार्यवाह सातारा, संपूर्ण यात्रेत आहेत रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारी सदस्य नागपूर, अंनिस मार्गदर्शक सल्लागार रवींद्र
तिराणिक , डॉक्टर राहुल साळवे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सहभाग दर्शवला.
ऊर्जा नगर येथील गर्ल्स हायस्कूलच्या जनसंवाद प्रास्ताविक व सूत्रसंचालन शशिकांत मोकाशे, तर प्रास्ताविक रामभाऊ डोंगरे व गीत सादरीकरण भगवान रणदिवे यांनी केले.
कार्यक्रमात दशरथ वाघमारे अविनाश टिपले , विमललाल साव, गंगाताई हस्ते ,कांचन रत्नपारखी , सतीश अवताडे, विपिन मानकर, रवींद्र मोटघरे, डॉक्टर व्ही मेश्राम, संजय बोरकर, मनीष कन्नमवार ,सपना नंदुरकर, मनीषा पेंदोर, रमा वाघमारे ,नलिनी देशमुख, सचिन मते, विजयकुमार जांभुळकर, नामदेव रामटेके,, शारदाताई खोब्रागडे .लताताई टिपले ,अनिता भजभुजे, लताताई साव, जयंती वनकर आदींनी अथक परिश्रम घेत सहभाग दर्शवला.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793