राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे विचार देशासाठी मार्गदर्शक – आ. किशोर जोरगेवार

0
37

________________________

राष्ट्रपिता महात्मा गांधी  आणि भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती  निमित्त मातोश्री विद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

___________________________

  1. आमदार किशोर जोरगेवार यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला केले माल्यार्पण

 ____________________________

थोरांची जयंती साजरी करत असतांना त्यांचे विचारही आत्मसाद केले पाहिजे. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाने प्रेरित होऊन देशसेवेसाठी आपण तत्पर असले पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे विचार देशासाठी मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

_________________________

गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित मातोश्री अकॅडमी, मातोश्री उच्च प्राथमिक शाळा, मातोश्री माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळेत संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा. सूर्यकांत खनके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गांधी चौक येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन गावंडे, गोपालजी अमृतकर, राजेशजी गर्गेलवार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

__________________________

आज सकाळी 7.00 वाजता सायकल रॅली व मोटरसायकल रॅलीद्वारे विद्यार्थी व शिक्षक मातोश्री विद्यालय ते जटपुरा गेट येथे पोहोचले. येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्मारकाला मान्यवरांनी सुतमाला अर्पण केली. त्यानंतर सकाळी 7.45 वाजता जटपुरा गेट ते गांधी चौक पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दीप प्रज्वलन करून महात्मा गांधी यांच्या स्मारकाला आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस सूतमाला अर्पण केली. महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनांचे गायन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित नृत्य सादर करण्यात आले.

_____________________________

यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, भारतात  गांधी जयंती ही देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या भावनेने साजरी केली जाते. स्वातंत्र चळवळीच्या या महान नेत्याची तत्त्वे आणि रणनीती यांच्या स्मरणार्थ लोक गांधी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. विशेषतः महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी जयंती साजरी करणे महत्वाचे आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी अथक लढा दिला आणि प्रसंगी आपले जीवन पणाला लावले. त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले त्यामुळे त्यांना अनेक वेळा अटक झाली. त्यांचे हे योगदान देश कधीही विसरणार नाही असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षवृदाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

_________________________

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

_________________________

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here