===============≈=========
हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा व आनंदाचा दिवस- राहूल पावडे
===≈=≈==================
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती ऐतिहासिक वाघनखे इंग्लंडमधील ब्रिटनच्या म्युझियम मध्ये आहेत. ही वाघनखे भारतात आणण्यासाठी महाराष्ट्राचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार हे अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. त्या प्रयत्नांना यश येवून इंग्लंडच्या सरकारने ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणण्यासाठी परवानगी दिली आहे. या ऐतिहासिक करारावर नुकतीच ना. मुनगंटीवार यांनी लंडन येथे स्वाक्षरी केली. पुढील काही दिवसात ही वाघनखे भारतात येणार आहेत.
====================÷===
या घटनेचा आनंद व अभिमान प्रत्येक भारतीयाला झाला आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगराने शिवाजी चौकातील शिवाजी महाराज पुतळयासमोर आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला. याप्रसंगी बोलताना भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी कालचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक अविस्मरणीय आणि एक स्फूर्ती देणारा दिवस म्हणून नेहमीसाठी ओळखल्या जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी बाहेर काढत त्याचा वध केला. ती वाघनखे नोव्हेंबर महिन्यात भारतात येणार आहेत, ही भारतीयांसाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
=========================
जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महाराष्ट्राचे झुंजार नेतृत्व आमचे लाडके चंद्रपूरचे सुपुत्र आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारच्या वतीने ती वाघनखे भारतात आणण्याचे जे कार्य आहे आणि जो सामंजस्य करार आहे तो ब्रिटन येथील लंडनमध्ये झाला आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्त्यांसहित जल्लोष करीत आहोत.
=========================
याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, तुषार सोम, रामपाल सिंग, दिनकर सोमलकर, विठ्ठल डुकरे, रवी लोनकर, सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू, अजय सरकार, शीला चव्हाण, सचिन कोतपल्लिवार, राजेंद्र खांडेकर चांद सय्यद, चंद्रकला सोयाम, माया उईके, ज्योती तीखे, शीतल आत्राम, गुडधे ताई, मनीषा महातव, डोडाणी, नागोसे ताई, प्रमोद शास्त्रकार, विनोद शेरकी, धम्म प्रकाश भस्मे,सुनील डोंगरे, बाळू कोल्हणकर, मनोज पोतराजे, दिवाकर पुद्धटवार, श्याम बोबडे, सुभाष अदमाने, आकाश ठुसे आदींची उपस्थिती होती.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793