========================
मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढणारे मनोज झरांगे पाटील यांना कायदेशीर लढ्याचे मार्गदर्शन करीत नेतृत्व करणारे अॅड. गणेश मस्के यांची चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक युवा कर्तबगार कणखर नेतृत्व जनमंच सदस्य तथा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांची आंदोलनाच्या काही महिन्यापूर्वी पुणे दौऱ्यावर असताना (वाघोली) स्थळी एका विशेष सामाजिक विषयाच्या संदर्भात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक नायर , संदीप कांबिलकर, अॅड गणेश मस्के भेटीला आले होते. या प्रदीर्घ भेटीत विविध सामाजिक विषयावर चर्चा झाली. व त्यांच्या कार्याची ओळख झाली . संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेल्या मनोज झरांगे पाटील यांच्या आंदोलनाला, सामाजिक चळवळीतल्या विविध विषयांना हात घालणाऱ्या व दिशादर्शक मार्गदर्शन करणाऱ्या अँड .गणेश मस्के व अॅड .वाजेद खान हे खरे आंदोलनातील कायदेशीर मार्गदर्शन करणारे रियल हिरो आहेत असे मनोगत चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी व्यक्त केले आहे.
मराठा आरक्षणाला घेऊन अंतरवली जालना गावात उपोषणाला बसलेले मनोज झरांगे पाटील हे सध्या सर्व महाराष्ट्रात चर्चेत आलेले व्यक्तिमत्व शिवबा संघटना स्थापन करून मनोज झरांगे पाटील हे प्रथम
नावारूउपास आले. त्यांच्या या शिवबा संघटनेचे कायदेशीर काम अॅड वाजेद खान व अॅड गणेश मस्के
हे करत असे . अहमदनगर न्यायालयात कोपर्डीच्या आरोपींना आणले गेले त्यावेळेस त्यांच्यावर हमला केला असा आरोप करण्यात आला होता. यामध्ये मनोज झरांगे पाटील यांच्या नावाची चर्चा झाली होती. त्यांच्या समर्थकांनी हमला केल्याचा आरोप करण्यात आला होता. सदरील हे प्रकरण अहमदनगर न्यायालयात चालले होते. ते प्रकरण सामाजिक चळवळीतील कायदेशीर नेतृत्व करणारे कर्तबगार वकील अॅड. वाजेद खान व अॅड गणेश मस्के यांनी लढले होते. या प्रकरणाची बरीच चर्चा त्याकाळी झाली होती. या प्रकरणानंतर मनोज झरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेचे अॅड वाजेद खान व अॅड गणेश मस्के यांना त्यांच्या संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी निवड केली. त्यानंतर बरीच चांगली सामाजिक कामे शिवबा संघटनेच्या माध्यमातून केल्या जात आहेत. आज मराठा आरक्षणासाठी मनोज झरांगे पाटील यांचा अविव्रत लढा सुरू आहे. यात सल्लागार व मार्गदर्शक म्हणून अँड वाजेद खान व व पुणे येथील वाघोली मधील अॅड गणेश मस्के खंबीरपणे सामाजिक दायित्व बाळगत कायदेशीर लढा देत आहे. ते खऱ्या अर्थाने मनोज झरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहून या लढ्यातील रियल हिरो आहेत. त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ लागली आहे.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793