=====================
आज दिनांक 19 /10/ 2023 गुरुवार रोजी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात आप बल्लारपूर ची शहर कार्यकारिणीने राजुरा येथे आप जिल्हा उपाध्यक्ष सुरजभाऊ ठाकरे यांच्या उपोषण स्थळी भेट दिली व राजुरा विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध मागण्यांबाबत सुरू असलेल्या या उपोषणास पाठिंबा दर्शविला तसेच उपोषणानंतर देखील शासनाने मागण्यांबाबत विचार केला नाही तर सुरजभाऊंद्वारे जी पण पाऊले उचलली जातील त्यमध्ये आम आदमी पार्टी बल्लारपूर चा संपूर्ण पाठिंबा तसेच सहयोग राहील असे शहराध्यक्ष पुप्पलवार यांनी म्हटले. यावेळेस जिल्हा संघठन मंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार यांनी देखील उपोषणास पाठिंबा देताना मनोगत व्यक्त केले. यावेळेस शहर उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, संगठन मंत्री रोहित जंगमवार, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, सह सचिव आशीष गेड़ाम, भद्रावती शहराध्यक्ष सुरज शहा, उपाध्यक्ष सुमीत हस्तक, बल्लारपूर आदिवासी सेल अध्यक्ष अतुल मडावी, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी ,प्रज्वल चौधरी हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======≈==============
संपादक :- शशी ठक्कर 9881277793