=====================
नाचू कीर्तनाचे रंगी झालो मी अभंग
—————————————-
ज्या कृतीत अथवा कर्मात वारंवारिता असते त्याला वारी म्हटले जाते वारीही एकट्याने अथवा समूहाने करण्याची पद्धत आहे. तेराव्या शतकातील समकालीन नामदेववादी वैष्णवांना घेऊन संत ज्ञानदेवांनी पंढरीची वारी सुरू केली. ती आजतागायत चालू आहे आणि पुढेही चालू राहील.
—————————————-
‘एक महिना दहा दिवस’ पूर्ण करीत असलेल्या वारीत एक वर्षाच्या बाळापासून तर थेट ८० वर्षाच्या ज्येष्ठापर्यंत समावेश
—————————————-
वारकऱ्यांचा श्वास हरवला!
रस्त्यातच वारी दहा मिनिटं स्तब्ध झाली….. आणि वारकरी संप्रदायाचे थोर रत्न वारकरी वैभव ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने वारकऱ्यांचा श्वास हरवला ! अशी दुःखद भावना
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख, जनमंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांनी वारकऱ्या समवेत व्यक्त करीत सर्व वारकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली..
—————————————-
भक्ती भावात रममान होऊन गेली कित्येक दिवसापासून घरापासून कोसो दूर पैदल वारी करीत लहानग्यापासून तर मोठ्यांपर्यंत भक्ती भावात चिंब होऊन समाजाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, समाजाला श्रेयस्कर दिशा देण्यासाठी, अनिष्ट रूढी परंपरांच्या जीवघेण्या जोगडातून मुक्त करण्यासाठी, कर्मनिष्ठ रुजावी समाज संवेदनशील, रसिक आणि मानवतावादी व्हावा म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी ‘प्रबोधनाची पायी’ वारी साडेसातशे वर्षांपूर्वी सुरू केली. ती आजतागत लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सुरू आहे.
‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा,वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’
अठरा पगड जातींच्या संतांना सोबत घेऊन समाजाचे मलिन चित्त शुद्ध करत, दररोज २५ ते ५० किलोमीटरचा प्रवास करीत दर मुक्कामी कीर्तन, प्रवचन, सुसंवाद करत प्रबोधनाची वारी पंढरीला नेण्याची अभिनव परंपरा महाराष्ट्रात कित्येक शतकांपासून सुरू आहे.
आजही वेगवेगळ्या दिंड्या चालणारे वारकरी कीर्तनकार दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन, प्रवचनाच्या रूपाने ज्ञानोबा, तुकोबा, नामदेवराय आधी संतांच्या अभंगावर निरूपण करतात . वेगवेगळ्या मनोरंजनासोबतच लोकप्रबोधनाची पताका खेड्यापाड्यांमध्ये लोकमानस शुद्ध करीत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला माणुसकीचा धर्म पाळीत तो विचार सर्वसामान्य मध्ये रुजवण्याचा प्रयत्न करीत ही प्रबोधनाची वारी अंगात कुठलाही थकवा न बाळगता पुढे पुढे चालत आहे . चंद्रपूर महाकालीचे दर्शन घेऊन चंद्रपूर -नागपूर हायवे रोड वरून निघालेल्या वारकऱ्यांची सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांनी संवाद साधित वारी संदर्भात माहिती जाणून घेत यथायोग्य सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करीत पुढील प्रवासास निरोप दिला. वारीत
नेवासा,यवतमाळ ,महागाव ,परभणी ,
हिंगोली ,नांदगव्हाण रहिवासी असलेले सागर लोखंडे, भगवान हेंगड, माधव गजभार, तुकाराम शिंदे, मुंदाजी शिंदे, विशाल कबले, विलास आडे, शितल आडे, पारूबाई पवार, पूजा कबले, लहान बालक वैष्णवी कबले, हर्षद कबले आदींचा उत्साहवर्धक समावेश आहे.
भक्तीभावानी पंढरीत पोहोचत चंद्रभागा म्हणजे पांडुरंगाची साक्षात करुणा त्या चंद्रभागेत स्नान , पांडुरंगाचे दर्शन, नाम संकीर्तन संत सज्जनाच्या भेटी घेऊन आणि गोपाल काल्याचा प्रसाद घेऊन वारकरी आपापल्या गावी परततो ही या वारीची किमया म्हणावी लागेल.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793