===================
02/11/2023 गुरुवार –
शालेय पोषण आहारासंदर्भातील जिल्ह्यात कोठेही नसलेली केंद्रीय स्वयंपाकगृह पध्दत फक्त बल्लारपूर शहरातच कार्यरत आहे. या केंद्रीय स्वयंपाकगृहात स्वयंपाकी व मदतनीस यांना शासननियमानुसार मासिक 2500 रूपये मानधन न देता फक्त 1000-1500 रूपये इतकीच रक्कम त्यांना दिली जात आहे. या अन्यायाविरोधात या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. यासाठी पक्षाने बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी या सर्वांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर सखोल चर्चा करून निवेदन सादर केला, परंतु आजपर्यंत या अन्यायाची दखल घेतली गेली नाही. तेव्हा एक प्रकारे या महिलांचे आर्थिक व मानसिक शोषण होत आहे असे लक्षात घेऊन शेवटी पक्षाने आज कामगार आयुक्त चंद्रपुर यांच्याकडे निवेदन सादर केले व जर या नंतरही कोणतीही कार्यवाही होतांना दिसून आली नाही तर संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी दिला.
निवेदन सादर करतांना जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हासंघठन मंत्री प्रा. नागेश्वर गंड़लेवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतीताई बाबरे ,महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, मदतनिस कविता रंगारी, नागुबाई, पोर्णिमाताई, रज्जमा जंगमवार इत्यादी पदाधिकारी व मदतनीस महिला उपस्थित होते.
====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793