========================
सेंट थॉमस कॅथोलिक चर्च च्या वतीने रोझरी, नोव्हेना आणि होली मास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अम्मा चा टिफिन या कौतुकास्पद उपक्रमाबदल आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई म्हणजेच अम्मा यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांचे सुपुत्र प्रसाद किशोर जोरगेवार, फादर बिबन थेकेकारा, फादर जोसिक कुट्टी, यंग चांदा ब्रिगेडचे हरमन जोसेफ, वर्गीस एनपी, नायजेल जॉब, मानिकचंद, जो जॉर्ज, फेलोमिमा, जॉली वर्गीस, प्रतिभा सिडाम, थॉमर्स पीए, थम्बी, करुना, भावना जोसेफ, पिटर दास, आरती जोसेफ, जयन मॅथ्यु आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात अम्मा का टिफिन या उपक्रमाला सुरवात करण्यात आली आहे. मागील तिन वर्षा पासून हा उपक्रम कोणताही खंड न पडता नियमित सुरु आहे. या उपक्रमा अंतर्गत गरिब गरजूंना घरपोच जेवणाचा डब्बा पोहचविला जात आहे. यासह अम्मा टिफिन परिवारातील सर्व वयोवृध्द सदस्यांची नियमित आरोग्य तपासणी केल्या जात आहे. या उपक्रमाला अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली आहे. दरम्यान याच कार्याबदल सेंट थॉमस कॅथलिक चर्चच्या वतीने अम्माचा सत्कार करण्यात आला आला. यावेळी अम्माचा दिर्घायुष्यासाठी चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली.
कोणाताही गरिब गरजू उपाशी झोपू नये यासाठी आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमा अंतर्गत अनेकांना डब्बा पोहचविला जात आहे. हा उपक्रम नसून ही एक सेवा असल्याचे यावेळी अम्मा म्हणाल्या या कार्यक्रमाला ख्रिस्ती बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793
संपादक :- शशी ठक्कर 9881277793