==================≈
*भाजपा जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रसंतांना अभिवादन*
==========≈≈≈=======
*झाड झडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना,*
===================≈=
*फत्तर सारे बॉब बनेंगे, नाव लगेगी किनारे,*
=====================
या भजनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारताला स्वातंत्र मिळण्यापूर्वीच चिमुर येथे १९४२ रोजी स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटविले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा देत असतांनाच अनेक सामाजिक कार्य केले. अंधश्रध्दा निर्मुलन व जातीभेदाच्या निर्मुलनासाठी त्यांनी भजनांचा आणि किर्तनांचा प्रभावीपणे वापर करुन जनप्रबोधन केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही मिळत असून सामाजिक कार्य करण्याची उर्जा त्यामधून मिळते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.दि. ०२ नोव्हे. २०२३ रोजी गिरणार चौक येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंतांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गुरुदेव सेवक आनंदराव मांदाडे, माया मांदाडे, विजय चंदावार, श्री माता कन्यका सेवा संस्थेचे सचिव राजेश्वर सुरावार, मंडळ अध्यक्ष संदिप आगलावे, विठ्ठल डूकरे, सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर, दिनकर सोमलकर, बी.बी. सिंग, माया उईके, चंद्रकला सोयाम, बाळू कोलनकर मधुकल राऊत चांद सय्यद, संजय निखारे, अमोल मत्ते, गिरीधर येडे, रमीता यादव, प्रभा गुडधे, महेश झिटे, राजेश यादव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793