दिवाळी साजरी करतानाच रांगोळी स्पर्धेत सहभागी व्हावे:- अल्का आत्राम

0
51

===================

आज भाजपा महिला मोर्चा चंद्रपूरच्या वतीने बेटी बचाओ पढाओ रांगोळी स्पर्धा घर तिथे रांगोळी आयोजित करण्याच्या निमित्ताने जिल्हा बैठक पार पडली. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2014 पासून मुलींचे शिक्षण मुलीची सुरक्षा आणि मुली महिला यांना आत्मनिर्भर सक्षम करण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. त्याचाच एक भाग आज महिला आत्मनिर्भर होऊ लागल्या सक्षम सन्मान प्राप्त करू लागल्या म्हणून त्या सर्व योजना घरा घरापर्यंत पोहचव्यात यासाठी घर तिथे रांगोळी आयोजित करण्यात येणार आहे.या रांगोळी स्पर्धेचे आयोजन विधानसभा स्तरावर होणार आहे यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहन पर बक्षीस ठेवण्यात येणार आहे. ही स्पर्धाची नोंदणी 6 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत करण्यात येईल रांगोळी स्पर्धा 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत होणार आहे. या बैठकीला अल्का आत्राम प्रदेश महामंत्री महिला मोर्च्या यांचे अध्यक्षतेखाली, सविता पुराम सहसयोजिक बेटी पढाव बेटी बचाव, वंदना अगरकाठे महामंत्री तथा जिल्हा सयोजिक बेटी बचाव बेटी पढाव, विजयालक्ष्मी डोहे महामंत्री, सायरा शेख महामंत्री, रत्नमाला भोयर ओ बी सी अध्यक्ष, अर्चना जिवतोडे कोषध्यक्ष, आणि सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते.अल्का आत्राम यांनी या स्पर्धेतून महिलांनाच्या योजना घरा घरात पोहचवा असे प्रतिपादन केले सविता पुराम यांनी सर्व महिलांना स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.या स्पर्धेत नोंदणी करण्यासाठी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांचेशी संपर्क साधावे तसेच जास्तीत जास्त संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा महिला मोर्चाचे वतीने करण्यात आले.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==============≠≠=======

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here