=======================
*शशिकांत मोकाशे*-73045830354
========≠==============-
नोव्हेंबर 2023 रोजी मुरलीधर जी बगला कॉन्व्हेंट स्कूल चंद्रपूर येथे आयोजित दोन सत्रातील कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम ” बालविवाह मुक्त भारत जनजागरण कार्यशाळा ” कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री पंधरे सर सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद माध्यमिक विभाग तसेच असंच तू जस्टीस प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी तथा मुख्य मार्गदर्शक श्री शशिकांत मोकाशे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा उद्देश आहे डॉक्टर कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यु एस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात घरोघरी, शाळा, महाविद्यालय कार्यालये, तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर ग्रामस्तरावर विविध कार्यशाळा नोंदवून लोकांमध्ये बालकांच्या कायद्या विषयी जनजागृती करणे, बालकांना त्यांची हक्क मिळवून देणे, शासनाच्या बालकांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे, बालकांसाठी सरकारी स्तरावर कोणकोणत्या योजना व कशा पद्धतीची मदत उपलब्ध आहे त्यासाठी कोणकोणत्या विभागामार्फत त्यांची पूर्तता केली जाते यावर सखोल प्रकाश टाकने, बालकांवर होणारे अत्याचार, बालकांकडून करून घेतल्या जाणारी मजुरी, परराज्यात किंवा देह व्यापारासाठी बालकांची तस्करी, मोबाईलचा वाढता वापर त्यामुळे बालकांचे होणारे नुकसान, बालकांचे अधिकार, बालकांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सोयी सवलती व योजनांची माहिती देण्यात आली सदरचा कार्यक्रम रुलर अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन गडचिरोली मुख्य कार्यालय चंद्रपूर श्री काशिनाथजी देवगडे सर यांच्या प्रेरणेतून जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. कार्यक्रमात सरते शेवटी बालकांनी विद्यालयाच्या आवारात शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यासह बालविवाहाला प्रतिकार करू बालविवाह करणार नाही करणार नाही असा कुठेही प्रकार घडताना दिसला तर त्याला आळा घालण्याचा त्यांना समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करू अशी राष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या अभियानाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रांजली गर्गेलवार मॅडम यांनी केले.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
================≠=====
संपादक :- शशी ठक्कर 9881277793