======================≈=
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भाऊबिज कार्यक्रमाचे आयोजन
=========================
यंग चांदा ब्रिगेड संघटना नसुन हा परिवार आहे. या संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी मी कटिबध्द आहे. दरवर्षी आपण हा कार्यक्रम आयोजित करुन औक्षवंत करता. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असतो. बहिन म्हणजे आईचे दुसरे प्रतिबिंब असुन आपला स्नेहरुपी आर्शिवाद आपण माझ्यावर कायम राहिला आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
=======================
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमात निवासस्थानी भाऊबिज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कल्याणी किशोर जोरगेवार, यंग चांदा बिग्रेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, अल्पसंख्यांक विभाग महिला शहर प्रमुख कौसर खान, आशा देशमूख, विमल कातकर, कविता निखारे, निलिमा वनकर, शमा काजी, प्रमीला बावणे, अनिता झाडे, वैशाली मेश्राम, अस्मिता डोणारकर, शाहिन शेख, वैशाली रामटेके, माला पेंदाम, कल्पना शिंदे, वैशाली मद्दीवार, सोनाली आंबेकर, अल्का मेश्राम, चंदा ईटनकर, नंदा पंधरे, माधूरी निवलकर, वंदना हजारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, राखी आणि भाऊबीज या कार्यक्रमासाठी आपण दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. दरवर्षी वाढत असलेली बहिणींची संख्या आनंददायी असली तरी बहिणींप्रती जबाबदारीची जाण करुन देणारी आहे. भाऊ म्हणून कुठे कमी पडणार नाही यासाठी माझे सदैव प्रयत्न राहीले आहे. आमदार म्हणून विकासकामे करत असतांना मला बहिनींचा कधीच विसर पडला नाही. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आपण विविध ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केलेत. त्यांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आपण करणार आहोत.
माझ्या अनेक बहिनी या सर्वसाधारण कुंटुबातील आहे. याची मला जाण आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक राहणीमान उंचवावे, त्यांनी स्वत:चा रोजगार उभा करुन स्वाभिमानाने जगावे यासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. स्वयंरोजगारा संबंधित अनेक महागडे प्रशिक्षण आपण आपल्या भगीनींना निशुल्क उपलब्ध करुन देत आहोत. विविध भागात आपण ब्युटी पार्लर, मेकअप, शिवणकाम, फॅशन डिझायनींग या सारखे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहोत. जवळपास आपण दोन हजार महिलांना या शिबिराच्या माध्यमातुन प्रशिक्षित केले आहे. यातील अनेक महिलांनी प्रशिक्षीत होउन स्वत:चा रोजगार सुरु आहे. सुरवातीला त्यांना कमी मिळकत मिळत असली तरी त्या आत्मसन्माने जगू लागल्या आहे. परिवाराच्या उदरर्निवाहा मध्ये आर्थिक मदत करुन लागल्या आहे. याचा आनंद असल्याचे यावेळी ते म्हणाले. पूढे ही आपण गरज तिथे शिबिरे या उपक्रमा अंतर्गत सदर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांसह मतदार संघातील भगीनींनी आमदार किशोर जोरगेवार यांना औक्षवंत करुन ओवाळनी केली. सर्व भगीनींना आमदार किशोर जोरगेवार यांनीही ओवाळणी स्वरुन भेट वस्तु देत त्यांना भाऊबिज या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांसह शेकडो महिलांची उपस्थिती होती.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793