======================
*बल्लारपूर*
========================
रविवार दि. 26/11/2023 – शहरात आम आदमी पक्षातर्फे सलग तिसऱ्यांदा संविधान दिन आणि पक्ष स्थापना दिवस शगुन लॉन समोरिल खुल्या मैदानात आयोजित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजावे या उद्देशाने 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी “आर्टिकल हस्तलेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत आहे.ज्यामध्ये संविधानातील कोणत्याही एका कलमाचे सिग्नेचर पेपरवर विद्यार्थ्यांना प्रस्तुतिकरण करावे लागणार आहे.तसेच 26 नोव्हेंबर रोजो कार्यक्रमाची सुरूवात नगरपरिषद चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस मानवंदना करून जनतेत ऐक्य भावना रुजविण्याच्या उद्देशाने नगरपरिषद चौकातून कार्यक्रम स्थळापर्यंत ढोल ताशांच्या गजरात तसेच जय भीम जय संविधानच्या जयघोषात ‘मशाल यात्रा’ काढण्यात येणार आहे. यानंतर कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर विविध धर्मांच्या धर्मगुरूंच्या हस्ते मोठी मशाल पेटविण्यात येईल. हि मशाल म्हणजे सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी “एकता कि मशाल” व हा महोत्सव म्हणजे “एकता की मशाल महोत्सव” असणार आहे. या महोत्सवात घटम वादक तेजस खरात व 15 वर्षीय सप्त खंजेरीवादक कीर्तनकार कु. तुलसीताई हिवरे यांच्या संविधान प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार. कार्यक्रमास पक्षाचे गुजरातमधील वजनदार नेते व महाराष्ट्र सह प्रभारी गोपाल इटालिया जी, राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे जी महाराष्ट्र राज्य, ज्येष्ठ नेते रंगाभाऊ राचुरे जी, राज्य समिति सदस्य डॉ देवेंद्र वानखेड़े जी, राज्य संगठन मंत्री भूषण ढाकुलकर जी, विदर्भाचे माजी कोषाध्यक्ष जगजीत सिंह जी, तसेच जिल्हा कार्यकारिणी, जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच शहर कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित असणार आहेत.संविधान दिनाच्या दुसर्या दिवशी म्हणजेच 27 नोव्हेंबर ला आम आदमी पक्षातर्फे शहरातील कला मंदीर जवळील नाट्यगृहात सत्कार समारोह देखील आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये शहरातील पत्रकार, गुणवंत विद्यार्थी, निस्वार्थ सामाजिक कार्य करणारे नागरिक अश्या अनेक गणमान्य व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793