=========================
*चंद्रपूर *
======================
महानगर चव्हाण कॉलनी गणेश मंदिर येथील सामाजिक कार्यकर्ता उज्ज्वल बराल यांच्या मागणी नुसार पंतप्रधान विश्वकर्मा योजने बद्दल माहिती देण्या करिता सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा वन मंत्री, पालकमंत्री चंद्रपूर वर्धा मा. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार व मागासवर्गीय राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराजभैय्या अहिर यांच्या मार्गदर्शनात एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी विश्वकर्मा योजनेचे चंद्रपूर जिल्हा मुख्य संयोजक श्री डॉ. मंगेश गुलवाडे (माजी जिल्हा अध्यक्ष भाजपा महानगर चंद्रपूर ) यांनी विश्वकर्मा योजनेची सखोल माहिती देऊन हि योजना कशी फायदेशीर आहे व करागीरांसाठी संजीवनी आहे हे स्पष्ट केले. या योजनेचा यथायोग्य लाभ पात्र कामगारांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते अरुण तिखे (विधानसभा संयोजक)विनोद शेरकी(ओबीसी मोर्चा अध्यक्ष ),शशिकांत मस्के तथा रमेश थेरे गोपाल तिवारी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वल बराल,अनुप देवनाथ, गजानन वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793