========================
गुरुनानक देवजी यांच्या प्रकाशपर्वा निमित्त शीख समाज बांधवांकडून शहराच्या मुख्य मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्रेचे यंग चांदा ब्र्रिगेडच्या वतीने कस्तुरबा मार्गावर स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, सदनामसिंह मरधा, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, देवा कंुटा, विलास वनकर, चंद्रशेखर देशमूख, कार्तिक बोरेवार, जय मिश्रा, आदींची उपस्थिती होती.
शीख बांधवांचे पहिले गुरु गुरुनानक देवजी यांचा 554 वा प्रकाशपर्व मोठ्या उत्साहात साजरा केल्या जात आहे. या निमित्त आज महाकाली मंदिर जवळील गरुद्वारा गुरुसिंग सभा येथुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्रा जटपूरा गेटला वळसा घालुन कस्तुरबा मार्गे पून्हा महाकाली मंदिर येथील गुरुद्वारा येथे पोहचली. तत्पुर्वी कस्तुरबा मार्गावरील महाराणा प्रताप चौकात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी स्वागत मंच तयार केला होता. सदर शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायेचे स्वागत केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=====================÷==
संपादक :- शशी ठक्कर 9881277793