यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
41

=======================

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकरबहुजन महिला विभागाच्या महिला शहर प्रमुख विमल काटकरसविता दंडारेसायली येरणेनिलिमा वनकरकल्पना शिंदेआशा देशमूखअल्का मेश्राममाधूरी निवलकरकविता निखाडेमंजुषा दरवरेवंदना हजारेरश्मी नागराळेपपिता जुनघरे, ज्योती सिन्हा ,नाजी शेखवैशाली मद्दीवार आदींची उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ शेकडो अनुयायी एकत्रीत आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक  येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच या निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण  करून अभिवादन केले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

====≠==================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======≠================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here