==========================
महामानवाचे विचार आजही प्रेरणादायी – राजेंद्र खांडेकर
=========================
युगानुयुगे शोषण झालेल्या समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहामध्ये आणत प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार बहाल करणारे व राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक असोसिएशन द्वारे एस.टी. वर्कशॉप चौक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ऑटो स्टॅंडवर विनम्र अभिवादन करण्यात आले.
======================
दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक असोसिएशन द्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहून देशामध्ये समतेचे, स्वातंत्र्याचे व न्यायाचे पर्व उभे केले. शोषित पिडीत, दीन-दलित, आदिवासी, शेतकरी-शेतमजुर व महिला वर्गाला सन्मानाचे जिवन त्यांच्यामुळे बहाल झाले आहे. त्यामुळेच त्यांचा स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रामुख्याने ऑटो रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, जिल्हा सचिव सुनिल धंदरे, जिल्हा संघटन प्रमुख विनोद चन्ने, प्रमोद वेरुडकर, विलास जुमडे, शंकर वनकर, सुनिल घटे, वामन टोंगे, अंकुश कौराते, वासुदेव कुबडे, दिनेश पाटील, राकेश पवार, जनार्धन गुंजेकर, संजय उराडे व असंख्य ऑटो रिक्षा संघट पदाधिका-यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793