*लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मळकट चित्रपट तयार करण्यासाठी निखिल कडुकर सज्ज*

0
226

 

चंद्रपूर शहरातील मध्यम वर्गीय कुटुंबात वाढलेल्या निखिलला लहानपणा पासूनच वाचनाची आवड होती मग झाली लिखाणाची सुरुवात.. निबंध लेखनापासून लहान सहान लेख नंतर छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे चित्रपट पाहण्या पासून झालेली सुरुवात आणि त्यामुळे चित्रपटाविषयी निर्माण झालेली आवड मग त्या आवडीतून चित्रपटाचा सुरू झालेला अभ्यास पुढे Workshop, Master Class, अनेक लेख, अनेक पुस्तकं यातून घेतलेलं चित्रपटासाठी लागणारं Technical ज्ञान आणि त्या नंतर प्रत्यक्ष Practical सुरू झालेला प्रवास म्हणजे कधी Assistant Director तर कधी Chief Assistant Director मग Associate Director असा प्रवास सुरू झाला आता पर्यंत निखिलने ५ मराठी चित्रपटात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे आणि आता वेळ आहे लेखक व दिग्दर्शक म्हणून प्रवासात पुढे जाण्याची त्यासाठी निखिलने मळकट नावाचं शिवधनुष्य हाती घेतले आहे

 

मळकट म्हणजे अस्वच्छ असा रंग.. मळकट रंग कष्टाचा.. मळकट रंग प्रगतीचा.. मळकट (Colour Of Progress) लेखक आणि दिग्दर्शक म्हणून निखिल सुरेंद्र कडुकर यांचा पहिला मराठी चित्रपट. साधारण नोव्हेंबर २०२१ मध्ये एका ठिकाणी गोष्टी गोष्टीत एका situation वर चर्चा सुरू झाली आणि त्यातून जन्म झाला मळकटचा. गेली दोन वर्ष दिवस रात्र बऱ्याच अडचणींचा सामना करत निखिल आणि त्यांची Team या चित्रपटासाठी काम करत आहे तर खूप मोठ्या अपेक्षा न बाळगता प्रामाणिक पणे चित्रपट आणि चित्रपटच करण्याचा प्रयत्न आहे आणि चित्रपट बनवणे सोपं नाही त्यामुळे सगळ्यांचा पाठिंबा व आशीर्वाद सोबतीला लागेल अस ते म्हणाले.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here