==========================
*आप शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक*
==========================
आज दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे झोपडपट्टी विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ सोनटक्के यांच्या उपोषण स्थळी भेट देण्यात आले. राहुल भाऊ सोनटक्के हे सातत्याने डोलारा प्रभागाच्या विकासाकरिता पाठपुरावा करत असते यावेळी सुद्धा त्यांनी डोलारा प्रभागाच्या विकासाकरिता आमरण उपोषणाची धाव घेतली. यांनी सतत प्रयत्न करून सुद्धा प्रशासनाने डोलारा प्रभागा च्या विकासाकरिता लक्ष देत नव्हते, शेवटी राहुल भाऊ यांना आमरण उपोषण साठी जाहावे लागले. राहुल भाऊ सोनटक्के यांच्या मागण्या प्रमाणे भद्रावती येथील डोलारा तलाव भवती संरक्षण भिंतीचे बांधकाम करून खोलीकरण करण्यात यावे व आउटलेट ची व्यवस्था करण्यात यावी व भद्रावती शहरातील संपूर्ण अतिक्रमण धारकांना नियमानुकूल करून जागेचे पट्टे देण्यात यावे व प्रशासनाने तत्काल यावर लक्ष देऊन पाठपुरावा करून मागण्या मंजूर करण्यात यावे. आम आदमी पार्टी भद्रावतीच्या शिष्टमंडळाने त्यांना भेट देऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन समर्थन पत्र जाहीर केले व त्यांना आस्वस्थ केले की आम आदमी पार्टी सदैव तुमच्या सोबत आहे व डोलारा वासियांकरिता व डोलारा प्रभागाच्या विकासाकरिता त्यांच्या या लढाईमध्ये सोबत आहे. यावेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, आप नेते अतुल भाऊ भैसारे, निखिल भाऊ जट्टलवार, वसीम भाई कुरेशी, सॅम्युअल गंधम, नितीन बावणे, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकार, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, नयनाताई गंधम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, सुरज पुल्लरवार, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे उपस्थीत होते.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793