*आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने योजना आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन*

0
44

======================

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातील निराधार व वयोवृध्द नागरिकांच्या सन्मानार्थ योजना आपल्या दारी हे शिबिर राबविण्यात येत आहे. या शिबिरात चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागातील नागरिकांडून विविध योजनेचे कागदपत्र गोळा केल्या जात असून सदर पात्र नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून दिल्या जाणार आहे.

========================

वढा येथे पार पडलेल्या शिबिराला  यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, ग्रामीण संघटक मुन्ना जोगी, वृषभ दुपारे, गुड्डू सिंग, जय मिश्रा, डॉ रमेश वराटे, चंदू मातणे, गणपत कुडे, भाग्यवान गणफुले, भूषण पिदुरकर आदींची उपस्थिती होती.

========================

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त मागील तिन दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. याच उपक्रमा अंतर्गत मतदार संघातील ग्रामिण भागात योजना आपल्या दारी उपक्रम राबविल्या जात आहे. यात नागरिकांच्या घरा पर्यंत जावून त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिल्या जात आहे.  या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अश्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता अर्ज स्विकारले जात आहे. मारडा, वेंडली, शेनगाव, चिंचाळा, तडाली, साखरवाही, छोटा नागपूर, पडोली, वढा, पांढरकवडा, पिपंरी, या भागात सदर उपक्रम राबविण्यात आले आहे.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here