===≠============≠====
* भद्रावती*
====================
*गड्ड्यामध्ये आंब्याचे झाड लावून केले, P.W.D अधिकाऱ्याचे SCAM उघड.*
=======================
आज दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी नागपूर – चंद्रपूर हायवे भद्रावती तालुक्यातील घोडपेठ च्या समोर तडाली रेल्वे पुलीयाच्या मधो-मधे खूप दिवसापासून मोठा गड्डा झालेला आहे. आम आदमी पार्टी भद्रावतीच्या वतीने वारंवार P.W.D अधिकाऱ्याला तक्रार देऊनही ते गड्डा बुजवण्यात आलेला नाही. त्या गड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत नागपूर-चंद्रपूर हायवे असल्यामुळे या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आवाजही होत असतात, तरी पण P.W.D अधिकाऱ्यांना घाम काही फुटत नाही. शेवटी आज आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर अध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, वसीम कुरेशी व मीडिया प्रभारी आमिर शेख यांनी मिळून त्या गढ्यामधे आंब्याचे झाड लावले. झाड लावून आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुरज शहा यांनी म्हणाले की “हा रस्ता चंद्रपूर-नागपूर हायवे आहेत या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आवाजही सुरू राहत असतात. रात्रीच्या वेळेस हा गड्ढा कोणालाच दिसत नाही, आणि या गड्यामुळे खूप सारे अपघात झालेले आहे. वारंवार आम्ही अधिकाऱ्यांना तक्रार देऊनही त्यांना घाम फुटला नाही. P.W.D अधिकाऱ्यांनी हा पुलिया निर्माण करायचे वेळी खूप मोठा प्रमाणात भ्रष्टाचार केला आहेत या गढ्यामुळे आज सिद्ध होते. ह्या गड्ड्यात आंब्याचा झाड लावण्यात येत आहे कारण ज्या P.W.D अधिकाऱ्यांनी इथे भ्रष्टाचार केला आहे त्यांनी जर हे गड्डा बुजवला नाही तर या आंब्याच्या झाडाला लागणारे आंबे त्या P.W.D अधिकाऱ्यानी घेऊन जहावे.”
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
====≠===================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069