*अबब ! घोडपेठ मधे चक्क सरकारी जमिनीची झाली रजिस्ट्री ?*

0
93

=======================

*आम आदमी पार्टी भद्रावतीने केला खुलासा.* 

========================

दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे मा. जिल्हाधिकारी साहेब विनय गौडा जी यांची भेट घेण्यात आली. भद्रावती तालुक्यातील घोडपेठ मधे चराई करिता सरकारी जमीनीची रजिस्ट्री करण्यात आली अशी तक्रार आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा यांना प्राप्त झाली. त्यांनी चौकशी केली असता, हा सगळा प्रकार भ्रष्टाचाराची संबंधित आहे असं दिसून आलं. काही पैशांसाठी रजिस्टार साहेब, ग्रामसेवक साहेब, सरपंच साहेब, उपसरपंच साहेब व इतर काही सदस्यांनी मिळून सरकारी जमिनीची रजिस्ट्री एका चाहत्या व्यक्तीला करून दिली अशी बाब उघडकीस आली. तरी आपणास विनंती आहे की या सगळ्या भ्रष्टाचार विषयी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा यांनी निवेदना द्वारे केली. यावेळी आम आदमी पार्टी चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवर, भद्रावती शहराध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर मीडिया प्रभारी आमीर शेख, युवा जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कुडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश भाऊ गोखरे, चंद्रपूर महानगर महासचिव तब्बसूम शेख व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here