*केपीसीएल विरोधात उपोषणाला बसलेल्या महिलांना आम आदमी पार्टी भद्रावतीचा पाठिंबा.*

0
44

=======================

    *भद्रावती*

========================

आज दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शिष्टमंडळ बरांज येथे KPCL विरोधात पुनर्वसन प्रकल्पग्रस्त महिला संघटना तर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. गेल्या 20 वर्षा पासून KPCL खदान हे बरांज गावातील लोकांना पुनर्वसनाचे आश्वासन देऊन फसवण्याचे काम करत आले आहे. आमदार, खासदार, पालकमंत्री, मंत्री केंद्रीय मंत्री हे सगळे KPCL कंपनी विरोधात दर वर्षी पुनर्वसन बाबत मोर्चे घेऊन येतात पण निकाल मात्र काहीच लागत नाही. म्हणून यावेळी महिलांनीच समोर येऊन आपल्या हक्काची लढाई लढत आहे. येत्या 25 तारीख पर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही सर्व महिला अन्न त्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मनोगत उपोषणकर्त्या महिलांनी व्यक्त केले आहे. आम आदमी पार्टी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या आंदोलनाला आम आदमी पार्टी चा जाहीर पाठिंबा आहे. KPCL कंपनीने महिलांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावे अन्यथा उपोषणकर्त्या महिलांच्या जीवाशी काहीही नुकसान झाल्यास KPCL कंपनी जिम्मेदार राहणार असे आवाहन आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी KPCL कंपनीला दिला आहे. यावेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, आप नेते अतुल भाऊ भैसारे, निखिल भाऊ जट्टलवार, वसीम भाई कुरेशी, सॅम्युअल गंधम, नितीन बावणे, तालुका अध्यक्ष सोनल पाटील, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, नयनाताई गंधम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, सुरज पुल्लरवार, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 942216806

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here