*आदर्श सांसद ग्रामपंचायत चंदनखेडा बनला आहे भ्रष्टाचाराचा अड्डा*

0
118

========================

*चंदनखेड्या* 

=========================

*चंदनखेड्यामध्ये होत आहे तलाठी इमारतीच्या बांधकामा मधे धांधली, आप चे दिलीप कापकर यांनी आणला भ्रष्टाचार उघडकीस.*

========================

आज दिनांक 04 जानेवारी 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे दिलीप कापकर यांनी भद्रावती तालुक्यातील आदर्श संसद ग्रामपंचायत असलेल्या चंदनखेडा या गावात तलाठी इमारतीचा बांधकामात होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला. गेल्या काही दिवसांपासून भद्रावती तालुक्यातील आदर्श संसद ग्रामपंचायत चंदनखेडा येथे तलाठी इमारतीच्या कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे व हे काम नागपूर येथील ठेकेदाराला मिळालेला आहे. या कामात गावकऱ्यांना दिसून आलं की हे काम निष्कृष्ट दर्जेच होत आहे. संबंधित बांधकामाची तक्रार गावकऱ्यांनी आम आदमी पार्टीचे दिलीप कापकर यांना दिली. संबंधित विषयाचे पाहणी करण्याकरिता आम आदमी पार्टी चे दिलीप कापकर, सुरज शहा व सुमित हस्तक जेव्हा गेले तेव्हा दिसून आल की तलाठी कार्यालयाचे बांधकामे एकदम निष्कृष्ट दर्जाचे सुरू आहे बांधकामा करिता माती मिश्रित वाळूचा वापर सुरू आहे. संपूर्ण इमारतीच्या बांधकामा मधे प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. सरकारी कामांमध्ये माती मिश्रित वाळूचा वापर होत असेल तर इमारत किती दिवस टिकेल व सामान्य जनतेला या इमारती मधे भविष्यात नुकसान झाल्यास कोण जबाबदार राहणार ? असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात पडला आहे. या आगोदर सुद्धा आम आदमी पार्टी ने आदर्श संसद ग्रामपंचायत असलेला चंदनखेडा या गावात रेती तस्करी संबंधित, ग्रामपंचायत कार्यालयात मद्यपान संबंधित व आता तलाठी इमारतीमधे होत असलेला भ्रष्टाचार. याविषयी काय कारवाही होते की, इथल्या स्थानिक नेत्यांचं संरक्षण ठेकेदाराला मिळते यावर सर्व गावकऱ्यांचे लक्ष पडल आहे.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here