*४ वर्षाच्या कालावधीनंतर महेश कोलावार व अनेकांच्या प्रयत्नांना आले यश*

0
66

=====================

*वर्ष २०२० मध्ये पहिल्यांदा सादर केले होते सदर मागणीचे निवेदन*

======================

*मध्यंतरी कालावधीतही विभागीय कार्यालयात घेतली होती धाव*

========================

*अनेकांच्या अनेक प्रयत्नानंतर चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी धावली आज लालपरी*

=========================

*चालक,वाहक व प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करीत पहिल्या दिवसाच्या दोन्ही फेरीच्या प्रवासाचा केला शुभारंभ*

======================

     *चंद्रपूर*

======================

अनेकांच्या अनेक प्रयत्नानंतर चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी आज लालपरीची सेवा सुरू करण्यात आली असल्याचे आनंद माझ्यासहित सिरोंचा वासियांना होत आहे असे प्रतिपादन भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केले आहे.

========================

पुढे बोलतांना कोलावार म्हणाले की वर्ष २०२० मध्ये सदर मागणीचा हट्टहास धरला असून याबाबतीचे पहिले निवेदन आपणच पुर्व विभागीय नियंत्रक आर.एन पाटील यांची भेट घेत सादर केले होते.

=====================

मध्यंतरी काळात देखील सिरोंचाचे माजी आमदार पेंटा रामा तलांडी,माजी तहसीलदार शंकर पुप्पालवार यांच्याही सुचनेनुसार आपण
या मागणीबाबतचे विषय घेऊन विभागीय कार्यालयात विचारपूस करत लालपरी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत अशी मागणी करत आले.

=======================

यानंतर खासदार अशोक नेते यांनी स्वत: सिरोंच्याला बैठक घेत विभागीय नियंत्रक कार्यालयाला सुचना करत आंतरराज्यीय परवानगी घेण्याचे सुचविले होते.
त्यानंतर अनेकांनी याबाबत निवेदन सादर केले होते.

==========================

अश्या अनेकांच्या प्रयत्नांना यश आल्याचे आनंदाची बातमी घेऊन भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी विभागीय नियंत्रक स्मिता सुतावने यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्वागत व अभिनंदन करत आभार मानले. सोबतच ही लालपरी सेवा सतत सुरू ठेवण्याची व दुपारच्या वेळेत बदल करून ३ वाजताच्या नंतर चालवावी अशी विनंती केली असता विभाग नियंत्रकांनी लालपरी सेवेच्या आर्थिक नफा – तोटांचा विचार करत सदर सेवा मागणीनुसार सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

=========================

तर अनेक प्रयत्नानंतर आज सिरोंचासाठी लालपरी रवाना होतांना सकाळी कार्यालयीन अधिकारी – कर्मचा-यांनी चालक,वाहक व प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करत पहिल्या प्रवासाचा शुभारंभ केला तर दुपारच्या फेरीत महेश कोलावार यांनी चालक,वाहक व प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करत पहिल्या दिवसातील दुस-या फेरीच्या प्रवासाचा शुभारंभ केला.ही लालपरी दररोज सकाळी ७ वाजता व दुपारी २ वाजता चंद्रपूरहून चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी रवाना होणार आहे.

===========================

यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी पुरूषोत्तम व्यवहारे, आगार प्रमुख प्रितेश रामटेके, सहाय्यक वाहतूक अधिक्षक हेमंत गोवर्धन,वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार,सहाय्यक वाहतूक निरीक्षक निलेश जुनघरे,भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार,चालक सुमित शेंडे,वाहक सचिन बैलनवार, नवनाथ वाढीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here