*पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची नोंदणी कक्षाला सदिच्छा भेट*

0
41

=========================

    चंद्रपूर

========≠===============
दि. ३ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान स्थानिक चांदा क्लब मैदानात ‘चांदा अॅग्रो २०२४’ शिर्षकांतर्गत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

=========================

बुधवार ३ जानेवारी २०२४ ला दुपारी १ वाजता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर कृषी महोत्सवाचे उद्घाटन सत्र पार पडले.दुस-या दिवशीपासून तर शेवटच्या दिवशीपर्यंत सकाळ – संध्याकाळ चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

=======================

या कृषी महोत्सव दरम्यान चौथ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या बिजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांच्या आमंत्रणावरून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माध्यमातून सुरू असलेल्या कॅलेंडर वाटप व नोंदणी कक्षाला सदिच्छा भेट दिली.

========================

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरे
,भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,रितेश वर्मा,नकुल आचार्य, प्रसाद काटपाताळ,मेघा ताटीकुडलवार,श्वेता चौधरी,अनिल देबटवार,वाघुजी गेडाम,मोनिका घुमे,बागेश्वर रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here