*विठाई महिला बचत गटाचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न*

0
46

=========================

चंद्रपूर- विठाई बहुउद्देशीय संस्थे अंतर्गत विठाई महिला बचत गट (सत्र दुसरे) यांचा हळदीकुंकूचा कार्यक्रम आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरणात मातोश्री लॉन जगन्नाथ बाबा नगर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विठाबाई काहीलकर, प्रमुख पाहुणे म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका डॉ. शितल वडलकोंडावार तसेच परीक्षक म्हणून सीमा टेकाळे यांची उपस्थिती होती.
विद्येची जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्व स्त्रियांसाठी मार्गदर्शनपर प्रेरक विचारांचे संमेलन *शोध माझ्यातीलच मी चा* या विषयावर डॉ. शितल वडलकोंडावार यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.
त्यानंतर महिला सदस्यांसाठी उखाणे स्पर्धा ,वन मिनिट स्पर्धा, पारंपारिक वेशभूषा अशा विविध मनोरंजनात्मक खेळाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. यात स्त्रियांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे आणि परीक्षकांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
चापले दांपत्यांचे विशेष आभार ज्यांनी हळदीकुंकू च्या कार्यक्रमाकरिता आपले मातोश्री लॉन उपलब्ध करून दिले.
विठाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश काहीलकर यांच्या हस्ते प्रमुख अतिथी आणि परीक्षकांना संस्थेतर्फे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन कीर्ती नगराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सीमा टेकाळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महेश काहीलकर ,मिथिलेश काहिलकर, कीर्ती नगराळे, सुषमा घटे , पुनम पाटील ,भारती जिराफे ,माधुरी काहिलकर, रश्मी वैरागडे ,शिवानी घटे, मीनाक्षी अलोने, सीमा टेकाळे, योगिता पाटील इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here