===========================
* वरोरा*
===========================
आज दि. 03 फेब्रुवारी 2024 रोजी बजरंग दल कडून गौवंश तस्करी करणारा ट्रक पकडुन कार्यवाही करण्यात आले. बजरंग दल वरोरा चे कार्यकर्ते यांना गुप्त सूचनेच्या आधारावर माहिती मिळाली की भरधाव ट्रक हा नागपूर रोड नी येत असून कत्तल खान्यावर ग्रामीण मार्गाने जात आहे. ही बाब लक्षात येताच वरोरा येथील कार्यकर्ते यांनी ट्रक न. MH 40 CM 3203 हा ट्रक चंद्रपूर या मार्गाने जाताना आढळला. ट्रक ड्रायव्हरला कळाले की आमच्या मागे कोणीतरी पाठलाग करत आहे म्हणून ट्रक ड्रायव्हर व त्याच्या साथीदार ट्रक लगाण बार च्या जवळ, रत्नमाला चौक येथे सोडून पडून जाण्याच्या मार्गाने लागले होते. तेव्हाच एक आरोपी हा मिळाला असून बाकी 2 आरोपी फरार झाला आहे व एका आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 60 गोमाता व काही बछडे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले व बजरंग दल मार्फत कारवाई करून जीवनदान देण्यात आले. गोवंश तस्करी कायदा लागू असताना असे प्रकार घडत असेल तर सरकारवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभे होताना दिसत आहे. यावेळी बजरंग दलचे कार्यकर्ते गौरव मेले, बंटी खडके, सतीश भैय्या निर्बान, दीपक भाऊ तुरारे, सुरज भाऊ शहा ,सुमित हस्तक, सूरज भाऊ दुबे, क्रिश भाऊ चौरासिया, बाला भाऊ चंभारे, आकाश भाऊ काकडे, राकेश भाऊ जेऊरकर, आदित्य भाऊ जुनघरे, संतोष भाऊ लक्षेटीवार, रोशन भाऊ पारखी, अभी भाऊ नागपुरे, व अनेक बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069