चंद्रपूरात शिव छत्रपती महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारा – आ. किशोर जोरगेवार

0
153

============================= अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केली मागणी =============================

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा  राज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा केला जात आहे. मात्र हे होत असतांना छत्रपती महाराज यांचा अश्वारूढ पुताळा चंद्रपूर सह राज्यातील अनेक जिल्हात आजही नाही. त्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नाही त्या ठिकाणी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे. =============================

आज गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी अर्थसंकल्पाचा समर्थनार्थ  आमदार किशोर जोरगेवार सभागृहात बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील विविध विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, सुमारे 17 किलोमीटर लांबीचा परकोट असलेले चंद्रपूर हे पुरातन शहर आहे. येथे 500 वर्ष जून मंदिर असुन 2 हजार वर्ष जुनी माता महाकालीची मुर्ती येथे स्थापित आहे. मात्र पूरातत्व विभागाच्या जाचक अटिंमुळे मंदिराचा अपेक्षित असा विकास झालेला नाही. येथे चैत्र अश्विनी महिन्यात यात्रा भरते. देशभरातील भाविक येथे येतात त्यामुळे सदर यात्रा परिसराचा विकास करण्यात यावा अशी मागणी यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.

===========================

चंद्रपुरातील इरई नदीला वारंवार पूर येत असतो. त्यामुळे मोठे नुकसान या भागातील नागरिकांचे होत आहे. त्यामुळे येथे पुर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, विदर्भातील पंढरपूर असलेल्या वढा तिर्थ क्षेत्राला महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस 25 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र ते मिळालेले नाही. त्यामुळे सदर निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा, जगात सर्वाधिक वाघांचा संरक्षण करणारा आमचा जिल्हा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने येथे टायगर सफारीची घोषणा केली होती. 171 हेक्टर जागेत 286 कोटी रुपये खर्च करत टायगर सफारी निर्माण होणार होती. चंद्रपूरच्या विकासाला चालणा मिळणार असलेल्या या घोषित टायगर सफारीचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

===========================

काळा राम मंदिराचा पर्यटनदृष्ट्या विकास करा

===========================

नाशिकला काळाराम मंदिर आहे. त्याच प्रमाणे चंद्रपूरलाही प्राचीन  असे काळाराम मंदिर आहे. येथे जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे या मंदिराच्या पर्यटनदृष्टा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here