पूर्ण ब्रम्ह श्री श्री हरिचंद ठाकूर यांच्या जयंती साठी चंद्रपूरातील हजारो भाविक पश्चिम बंगालला आमदार किशोर जोरगेवार यांनी रेल्वे स्थानकावर भाविकांची भेट घेत केले रवाना

0
39

======================

*चंद्रपूर* 

=======================

बंगाली समाजाचे भगवान पुर्ण ब्रम्ह श्री श्री हरिचंद ठाकुर यांच्या जयंती उत्सवनिमित्त चंद्रपूरातुन हजारो भाविक बश्चिम बंगालकडे रवाना झाले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर रेल्वे स्थानकावर सर्व भाविकांची भेट घेत त्यांना रवाना केले. तसेच पुर्ण ब्रम्ह श्री श्री हरिचंद ठाकूर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

========================
श्री श्री हरिचंद ठाकूर हे अविभाजित बंगालमधील अस्पृश्यांच्या उत्थानासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी समर्पित केले. 6 एप्रिलला त्यांची जयंती त्यांची कर्मभूमी असलेल्या पश्चिम बंगालच्या ठाकूर वाडी येथे साजरी केली जाणार आहे. यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने ठाकुर वाडी येथे दाखल होत आहे. चंद्रपूरातूनही मोठ्या संख्येने भाविक येथे पोहचत आहे. दरम्यान येथे पोहचण्यासाठी रेल्वे स्थानकावर भाविक एकत्रीत आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी भाविकांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्यात. आमदार किशोर जोरगेवार त्यांच्या भेटीसाठी रेल्वे स्थानकावर पोहचल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here