=========================
*चंद्रपूर*
==========================
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुण्यतिथी निमित्त खोब्रागडे परिवारच्या वतीने खोब्रागडे भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी बाळु खोब्रागडे, देशक खोब्रागडे, माझी नगर सेवक पप्पू देशमुख, सुलभ खोब्रागडे, मारोतराव खोब्रागडे, अक्षय येरगुडे, राजु शेंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आणि समाजप्रबोधक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आपले अवघे जीवन समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजातील भेदभाव मुळापासून उखडून टाकण्यासाठी संघर्ष केला. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे १८ वर्ष राज्यसभेचे खासदार राहिले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर समाजासाठी काहीतरी करा हे शब्द त्यांनी मनात पक्के ठेवत स्वतःला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत झोकून दिले. पूढे आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.त्यांचे विचार आणि जीवन कार्य सदैव आमच्यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी राहतील असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,