=========================== दाताडा येथे नवनिर्मित श्री संत गजानन महाराज मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम =========================== श्री संत गजानन महाराज यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. ते एक महान संत होते. त्यांनी भक्तीमार्गाने समाजाला दिशा देण्याचे काम केले. आज त्यांच्या मंदिराचे लोकार्पण व प्राणप्रतिष्ठापणा करतांना आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. ============================ स्व. कु. साक्षी संजय बुरघाटे यांच्या स्मुतीप्रित्यर्थ दाताडा रोड वरील सावित्रीबाई फुले उद्याण येथे श्री. संत गजानन महाराज मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. आज सोमवारी मंदिर लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजय बुरघाटे, अशोक मत्ते, श्याम घोपटे, माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, चंद्रहारपाटील गोहोकार आदींची प्रमुख उपस्थिती होती. ============================ यावेळी जोरगेवार म्हणाले कि, गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत असे. ‘‘गण गण गणात बोते,‘‘ हा त्यांचा आवडता मंत्र होता. ज्याचा ते अखंड ते जप करीत. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यांचे आज मंदिर उभे झाले आहे. हे एक मन शांती चे केंद्र ठरणार आहे. संजय बुरघाटे यांनी भाविकासांठी साकारलेल्या या मंदिरातुन भक्तीचा संचार होणार आहे. समाजातील दृष्ट शक्तीचा नाश होऊन सकारात्मकतेचा वास या परिसरात निर्माण होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची व श्री गजानन महाराज यांच्या भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ============================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ======================== संपादक :- शशि ठक्कर , 9881277793उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,