========================
*चंद्रपूर* ========================== दोन दिवसांपुर्वी चंद्रपूरात सुसाट्याच्या वा-यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. अशा कुटुंबांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या संघटिका सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, रुपा परसराम आदींची उपस्थिती होती. =========================== महाराष्ट्राच्या अनेक भागात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यावेळी सुसाट्याच्या वारा आणि विजगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. परिणामी शहरातील अनेक भागातील घरावरच्या टिना आणि कवेलू उडून गेले. तर अनेकांच्या घराच्या भिंती या पावसाने कोसळल्या. त्यामुळे अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे व धान्य खराब झाली असुन या कुटुंबांचे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा काही नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कडे मदत मागीतली असता पिडीत कुटुंबांना धान्य व आर्थिक मदत करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांना केल्या होत्या. =========================== त्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी दत्त नगर येथील सोपान इंगळे, मंगला इंगळे, उत्तमराव गुजरकर, भारत इंगळे, पंचशील इंगळे, मयुर इंगळे रमाबाई नगर येथील तारा डोंगरे यासह अनेक नुकसान ग्रस्त नागरिकांच्या घरी भेट देत त्यांना धान्य व आर्थिक मतद केली आहे. तसेच शासनासतर्फे मिळणारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. यंग चांदा ब्रिगेडची मदत मिळताच नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. =========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================ संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,