============================ भाजपचे चंद्रपुरातील संघटन अतिशय मजबूत, नियोजनबद्ध रितीने पार पडली निवडणूक – हरीश शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर ============================ चंद्रपूर, दि.२५ – चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रपूरमध्ये नियोजनाचा अभाव होता आणि काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रारी करण्यात आली त्यामुळे ना. मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. हे अतिशय निराधार वृत्त असून यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी म्हटले आहे. ========================= शहर व ग्रामीण भागात नियोजनबद्ध पद्धतीने काम केले गेले नसल्याची तक्रार भाजप व संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आणि ना.मुनगंटीवार यांनी स्वतः भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पावडे आणि भोंगळे यांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ग्रामीण व शहराची कार्यकारिणी बदलण्याच्या तयारीत असल्याचेही वृत्त काही माध्यमांमधून प्रकाशित केले जात आहे. पण हे वृत्त कपोलकल्पित असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही, असे हरीश शर्मा यांनी म्हटले आहे. =========================== या संपूर्ण निवडणुकीत पावडे असो किंवा भोंगळे असो भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेऊन निवणुकित सहभाग नोंदवला. ज्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे सांगितले जात आहे, तेसुद्धा खोटे आहे. कारण पक्षाची जी बैठक बोलावण्यात आली होती, ती केवळ मतदार यादीत जी नावे गहाळ झाली होती त्याविषयी चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पक्षामध्ये अशा बैठकांचे आयोजन निवडणुका असो अथवा नसो सातत्याने होत असते. असेही हरीश शर्मा म्हणाले. =========================== निवडणुकीनंतर एकंदरीत कामकाजावर चर्चा व्हावी, एकमेकांचे अनुभव शेअर करता यावे, यासाठी अशा बैठका पक्षात घेतल्या जातात. या बैठकीत ज्या विषयावर चर्चाच झाली नाही. या बैठकीत केवळ आणि केवळ मतदार यादीत मध्ये जी नावे गहाळ झाली त्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे आपल्याच मनाने वेगवेगळे अर्थ काढून कुणी काहीही बातम्या प्रकाशित करीत असतील, तर ते सर्वथा चुकीचे आहे. अशा खोडसाळपणाच्या बातम्या कुणीही देऊ नये, असेही हरीश शर्मा यांनी म्हटले आहे. =========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ========================= संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,