=============================
सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या केल्या सुचना
====================≠========
जिल्हा स्टेडियम हे चंद्रपूरातील प्रमूख ठिकाण आहे. भावी पोलीस येथे सराव करतात, अनेक खेळाडू येथून घडले आहे. जेष्ठ नागरिकांच्या व्यायामाचे हे प्रमूख ठिकाण आहे. त्यामुळे येथील विकासकामात हलगर्जीपणा करु नका, उत्तम दर्जाचे काम करत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांना केल्या आहे.
जिल्हा स्टेडियम येथे सुरु असलेल्या विकास कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान तक्रारींची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज गुरुवारी सकाळी जिल्हा स्टेडियम येथे जात येथील कामाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरातील जिल्हा स्टेडियम येथे विविध प्रकारच्या खेळांसाठी सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहे. येथे खेडाळू सराव करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. येथील विविध विकासकामांसाठी मोठा निधी प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. यातून येथे स्विमिंग पुल सह विविध कामे केल्या जात आहे. तर अनेक कामे पुर्णत्वास आली आहे. तर काही कामे प्रगतीपथावर आहे. दरम्यान या कामाचा दर्जा खालवत चालला असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात केल्या होत्या.
दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर कामाची पाहणी करत येथे येणा-या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी येथील स्विमिंग टॅंगचे काम उत्तम दर्जाचे नसल्याचे नागरिकांनी सांगितले याचीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. येथ, ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,