*जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये रोग निदान शिबिर संपन्न इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा उपक्रम*

0
39

============================           *चंद्रपूर*                =========================                    इंडियन रेड क्रॉस सोसायटी,टाटा कॅन्सर हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदीवान बांधवांचे रोगनिदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये बंदीवान बांधवांचे कान,नाक,घसा रोग, दंतरोग, त्वचारोग, नेत्र रोग व अस्थिरोग तपासून ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी सुद्धा करण्यात आली. ===========================              यावेळेस इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे बोलताना म्हणाले की, बंदीवान बांधव जरी काही कारणास्तव बंदी कारागृहात असले तरी आरोग्य तपासणी हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, आणि त्याच अनुषंगाने त्यांची निशुल्क तपासणी करून त्यांना आवश्यक तो औषधोपचार करणे हे ईश्वरीय कार्य आहे. ==========================                        या शिबिरासाठी डॉ. मंगेश गुलवाडे,डॉ.बी.एच. दाभारे,डॉ. संजय घाटे, डॉ.ट्विंकल ढेगळे,डॉ. रोहन कोटकर, डॉ. सत्यजित पोद्दार, डॉ. अक्षय येमुलवार, डॉ.वैष्णवी सहारे, डॉ. काजल विश्वास, डॉ.मनीषा दुपारे, डॉ. सुधीर जाधव,डॉ.गेडाम, डॉ. अक्षय चव्हाण, डॉ. कुंदन आळे, डॉ.अंकित अडसूळ, डॉ.सिता, डॉ. प्रवीण आसुटकर, डॉ.आशा गेडाम,डॉ.सागर, डॉ.मयूर आळे यांनी व प्रकल्प निर्देशक म्हणून आशिष बारबदे व पियुष मेश्राम यांनी सहभाग नोंदविला. =====≠======================                    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष मुरसकर, आरिफ काझी,निलेश पाझारे व आशिष गिरडकर यांनी अथक परिश्रम घेतले. ====≠=======================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ========≠========≠==========

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here