*वाहनचालकाने दिली धडक पुरुशोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू,वाहन चालक पसार*

0
28

=========================

अपघात की घातपात?,या दिशेने ही चौकशीची गरज. =========================            नागपुर(वि.प्र.)          ==========================

नागपूर येथील पुरुशोत्तम पुट्टेवार
हे शिव मंदीर कडून बालाजीनगर कडे जाताना दीनदयाळ लायब्ररी जवळून पायी चालत जात होते. तेव्हा पाठीमागून एक हयुंडाई कंपनीची आय 20 सारखे दिसणारे एक अज्ञात वाहन भरधाव वेगाने पाठिमागून आले आणि त्या वाहनाने पुरुशोत्तम यांना पाठीमागून ठोकले व फरपटत पुढे घेवून जावून त्यांना गंभीररित्या जखमी केले.त्यानंतर त्या अज्ञात गाडी चालकाने वाहनाचा वेग वाढवला आणि तो तिथून निघून गेला. तिथे असणारे लोकांनी सदर वाहनाचा Mh-31 6029 क्रमांकाचे वाहनाने धडक दिल्याचे सांगितले 22/ 05/2024 रोजी सकाळी 10:30 वा.चे सुमारास पुरूशोत्तम पांडूरंग पुट्टेवार, वयं 82 वर्षे हे शिववमंदीर कडून बालाजीनगर कडे पायी चालत जाताना त्यांना दीनदयाळ उपाध्याय लायब्ररी जवळ कोणत्या तरी अज्ञात वाहनाचे चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून भरधाव वेगाने धडक दिली व तिथे न थांबता चालकाने पळ काढला.अशी माहिती मिळाली असून या अपघातात पुरूशोत्तम पुट्टेवार गंभीररित्या जखमी होवून त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सदर अज्ञात वाहन चालकाचे विरोधात 24/05/ 2024 रोजी
मनिश पुरुशोत्तम पुट्टेवार त्यांच्या लहान मुलाने रिपोर्ट दिली असून अपराध क्र.312/2024 कलम 279, 304 अ भादवि सह कलम 134, 177 एम.व्ही.ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागपूर शहर अजनी पोलिस करीत आहे. ==========================                 अपघात की घातपात? ==========================                       या दिशेने ही चौकशीची गरज. ==========================                पुरुशोत्तम पुट्टेवार यांच्यावर 16 मे रोजी ही दोन मोटार सायकल सवारांनी लाठीने हल्ला करून पळ काढला होता ह्या घटनेनंतर 22 मे रोजी त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने व जिथे ही घटना घडली तेथे रस्ता मोठा असल्याने खरोखरच अपघात झाला की घातपात झाला या दिशेनेही सखोल चौकशी गरज असल्याचे बोलले जात आहे हे मात्र विशेष!, ==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here