============================
====================≠=========
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त धनगर समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्रा जटपूरा गेट जवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शित पेयाचे वाटप करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, महिला शहर अध्यक्षा वंदना हातगावकर, आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक आघाडीचे युवा शहर अध्यक्ष राशेद हुसेन, जय मिश्रा, सायली येरणे, राम जंगम, अस्मिता डोनाडकर, कविता निखारे, कैलास धायगुडे, विमल काटकर, अमोल नालमवार, रंजित मडावी यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही धनगर समाज बांधवांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त समाज बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर संध्याकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी जटपूरा गेट येथे स्वागत मंच उभारण्यात आले होते. शोभायात्रा यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचाजवळ पोहोताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. तर शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले. सदर शोभायात्रेत समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,