=============================
*Chandrapur*
================================
चंद्रपुर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांना झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर घेण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक सा. यांच्या संकल्पनेतुन सिन्देवाही पोलीस ठाणे येथे दिनांक 11/06/2024 रोजी सिन्देवाही तालुक्यातील सर्व संघटना व मंडळे यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करण्याचे ठरविले. त्याकरीता मागील 10 दिवसापासुन पोलोस पाटील, विविध संघटना, युवक मंडळे, व्यापारी संघटना, विविध सामाजीक व धार्मीक संस्था यांच्या बैठकी घेण्यात आल्या त्याबाबत सर्व स्तरातुन सकारात्मक प्रतीसाद मिळुन आला. =========================== त्या अनुषंगाने सिन्देवाही तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती, वन विभाग सिन्देवाही, व्यापारी असोशिएशन समिती, होमगार्ड पथक, तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव महिला वर्ग, युवक यांच्या सहकार्याने आगामी 14 जुन जागतीक रक्तदान दिनाचे औचीत्य साधुन त्याकरीता सामाजीक उपक्रम राबवून पोलीस स्टेशन सिन्देवाही येथे दिनांक 11/06/2024 रोजी सकाळी 08/00 वा पासून सायंकाळी 05/00 वा पावेतो भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते सदर रक्तदान शिबीरात तालुक्यातील सर्व स्तरातून उत्स्फुर्त प्रतीसाद मिळाल्याने एकुण 375 रक्तदात्यानी रक्तदान करुन सहभाग नोंदविला. सदर रक्तदान शिबीरात पहिल्यांदा रक्तदान करणारे युवा व महिलां रक्तदात्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग दिसुन आला तसेच 50 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे रक्तदात्यात्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिसुन आला. मा. श्री विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र राज्य यांचा आज रोजी सिन्देवाही येथे दौरा कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन सिन्देवाही येथे सदर रक्तदान शिबीराला सदिच्छा भेट देवुन रक्तदाताचे अभिनंदन केले आहे. ============================ वरील कार्यक्रम श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांच्या संकल्पनेतुन, श्रीमती रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपुर, व श्री दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनात सिन्देवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार तुषार चव्हाण, सपोनि अतुल स्थूल, पोउपनि अनील चांदोरे, पोउपनि सागर महल्ले व सहकारी पोलीस अमंलदार रणधीर मदारे, सत्यवान सुरपाम, मंगेश मातेरे, शरद सावसाकडे, संजीव गेडेकर, सुरज जांभुळे, डॉ अमोत प्रेमचंद, डॉ मिलींद झाडे, पंकज पवार (समाज सेवक अधीक्षक) व त्यांचे रक्त पेढी चंद्रपुर येथील पथक व डॉ. रोहन झाडे, ग्रामीण रुग्णालय सिन्देवाही व त्याचे वैद्यकिय पथक, यांनी पार पाडली. ============================ सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव, सर्व पोलीस पाटील, व्यापारी असोशिएशन समिती, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती, तालुक्यातील होमगार्ड पथक, तसेच तालुक्यातील सर्व युवा वर्ग व महिला वर्ग यांनी अथक परीश्रम घेतल्याने सिन्देवाही पोलीस ठाणे सिन्देवाही तर्फे अभिनंदन केले. ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,