=============================== *Chandrapur*
===============================
12/06/2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूरणा पोलिस स्टेशन अंतर्गत तालुका स्तरावर
मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतीखाली तसेच मा. बाल कल्याण समिती, चंद्रपूर बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर, महाराष्ट्र शासन कामगार विभाग व चाईल्ड हेल्प लाईन चंद्रपूर, रुदय संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विध्यमाणे बाल कामगार धाडसत्र आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यात 1 जून ते 30 जून पर्यंत राबवित आहे. त्याअनुषंगाने पोंभुर्णा पोलिस स्टेशन हद्दीतील शहरात विश्व बाल
कामगार विरोधी दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. बाल कामगार (प्रतिबंध व निर्मूलन)
अधिनियम 1986 अन्वये सर्व विभागाच्या सामूहिक सहभागातून पॉभूरणा शहरातील
शिवाजी चौक, बसस्थानक इत्यादि ठिकाणी बालमजुरी प्रतिबंध पत्रके लाऊन जनजागृती
करण्यात आले तससेच 21 आस्थापना मालकांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना अस्थापना निरीक्षक काकतकर, शशिकांत मोकाशे यांनी बाल कामगारापासून बालकांचे होणारे नुकसान व त्यांच्या जीवनात घडणार बदल, शिक्षणापासून दुरावणे,
बालकांच्या मदतीसाठी शासनाने निर्गमित केलेल 1098, 112 या टोल फ्री क्रमांक या सर्व बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी मा. बाल हक्क आयोगाकडून काही दिशा निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकास कोणत्याही आस्थापणावर काम करण्यास मनाई करण्यात आलेले आहे. जर अशा प्रकारचे बालके आस्थापणावर आढळून आल्यास भारतीय दंड विधान कलम 331, 370, 374, 34 नुसार अपराध दाखल करण्यात यावा. व मुक्त केलेल्या बालकाला सन्मान पूर्वक कलम 32 नुसार मा. बालकल्याण समितीसमोर उपस्थित करावे असे दिशा निर्देशचे जनजागरण करण्यात आले. सदरचे कार्यक्रम हे मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा. जि. सी. विनय गौडा, सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर श्री. मा. पे. मडावी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मा. दीपक बनाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा. अजय साखरकर यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कृती दलाच्या जनजागरण कार्यक्रमात
दुकाने निरक्षक श्री. अजय काकतकर, रुदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी श्री शशिकांत मोकाशे,
जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे हर्षा व्हराटे, चाईल्ड हेल्प लाईनचे दीपाली मसराम व पोलिस
विभाग पॉभूरणा प्रामुख्याने उपस्थित होते. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,