16 व 17 जुलै रोजी उर्स निमित्त भाविकांकरीता कारागृह खुले: अनुपकुमार कुमरे.

0
23

==============================

*चंद्रपूर * 

===============================

चंद्रपूर (का.प्र.) : चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या आतील परिसरात मुख्य तट क्र. 2 जवळ पुज्य हजरत मखदुम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली रहेमतुल्ला अलैह यांच्या समाधीस्थळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोहर्रम सणानिमित्त 16 व 17 जुलै 2024 हे दोन दिवस कारागृह सर्व भाविकांसाठी खुले राहणार आहे. ==============================     कारागृहात पुर्व प्रथेप्रमाणे उर्स यात्रा आयोजित करण्यात येत असल्याने समाधीच्या दर्शनाकरीता मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली रहेमतुल्ला अलैह यांच्या समाधीच्या दर्शनासाठी श्रध्दाळू भाविक लोकांची खुप गर्दी असते. सदर कालावधीत कारागृहाचे आतील समाधीच्या दर्शनाकरीता प्रवेश देण्यात येणार असून कारागृहाच्या आत कोणत्याही भाविकाला मोबाईल फोन, कॅमरा, खाद्यपर्दाथ उदा. पेढे, बर्फी अथवा इतर खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येणार असल्याने, नियमांचे अनुपालन करूनच समाधीस्थळी दर्शनाकरीता यावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे यांनी केले आहे. ==============================          दिनांक 10 जुलै रोजी चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्या अध्यक्षतेखाली दर्गा सेवक यांची बैठक दुपारी 12.30 वाजता घेण्यात आली. या बैठकीत हजरत मखदूम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली रहेमतुल्ला अलैह यांच्या दर्गाह येथे येणाऱ्या भक्तगणांना सहज दर्शन उपलब्ध होतील याबाबत विचार विनिमय करण्यात आले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता विशेष सूचनाही देण्यात आल्या सवारीला दर्गाच्या परिसरात प्रवेश मिळणार नाही याबाबत ही सविस्तर चर्चा झाली.या बैठकीला तुरुंगअधिकारी सतिश सोनोने ,कमलाकर मिरासे,सह दर्गाशरीफ सेवक सय्यद रमजान अली, मौलाना तुफैल अहमद, आमिल शेख , नझिर भाई,आसिफ पठाण,सय्यद नूर अली यांची उपस्थिती होती. ========================≠======        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  ===============================     कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                                  संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here