*राजे अम्ब्रीशराव महाराज यांचा दानशूरतेला तोड नाही, कमलापूर येथील गरीब बेरोजगाराला घेऊन दिले आँटोरिक्षा..!!*

0
15

==============================              

*राजे अम्ब्रीशराव महाराज यांचा दानशूरतेला तोड नाही, कमलापूर येथील गरीब बेरोजगाराला घेऊन दिले आँटोरिक्षा..!!* 🛺🛺🛺🛺

*कमलापुर* :- येथील राजु व्येंकटस्वामी येन्नमवार या गरीब तरुणाला वडिलांची छत्रछाया हरविल्यानंतर आई मोलमजूरी करुन ऊदरनिर्वाह करत होती.राजू सुध्दा मिळेल ते काम करुन घर चालवायला लागला होता. त्याने ड्रायव्हींग सुध्दा शिकून घेतले होते.होतकरु आणि प्रामाणिक राजुचे मित्रमंडळी सुध्दा त्याला मदत करण्याचे प्रयत्न करत परंतू स्वाभिमानी राजुला आत्मनिर्भर व्हायचे होते, आँटोरिक्षा चालवुन गुजराण करावी असा विचार त्याचा होता परंतू आँटोरिक्षा घेण्यासाठी भांडवल त्याच्याकडे नव्हते.मित्रांसह अहेरी राजमहालात येऊन माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव महाराज यांची त्याने भेट घेऊन आपली व्यथा सांगीतली.लगेचच एक गरीब बेरोजगार युवक स्वावलंबी व्हावे हे विचार करून.. प्रामाणिकतेला नेहमी प्रामाणिकपणे साथ देणार्‍या राजे साहेबांनी आँटोरिक्षा घेण्यासाठी राजु व्येंकटस्वामी येन्नमवारला *50,000/- ( पन्नास हजार रुपये )* देऊन मदत केल्याने राजुचे स्वप्न पुर्ण झाले, खरोखरच राजे साहेबांचा दानशूरतेला तोड नाही.. राजु आणि त्याच्या सर्व मित्रमंडळींनी राजेसाहेबांचे आभार मानले..!!   ===============================               *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      ================================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here